येत्या रविवारी RTGS सेवा 14 तासांसाठी बंद!

येत्या रविवारी RTGS सेवा 14 तासांसाठी बंद!

नवी दिल्ली l New Delhi

येत्या रविवारी (दि. 18) एप्रिल रोजी रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सुविधा तब्बल 14 तास ठप्प राहणार, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आज (दि. 12) सोमवारी दिली आहे.

आरटीजीएसच्या चांगल्या व्यवहारासाठी यंत्रणा अधिक अद्ययावत केली जात आहे. त्यासाठी ही सेवा 14 तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांनी त्यांचे महत्त्वाचे काम अगोदरच करून घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात आरबीआयने लेखी नोटीस बजावली आहे.

बँका आपल्या ग्राहकांना पेमेंट ऑपरेशनच्या योजनेबद्दल माहिती देणार आरबीआयने सांगितले की, “सदस्य बँका आपल्या ग्राहकांना पेमेंट ऑपरेशनच्या योजनेबद्दल माहिती देऊ शकतात. आरटीजीएस सदस्यांना सिस्टम प्रसारणाद्वारे माहिती देत राहू. त्याच वेळी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) प्रणाली सामान्यपणे सुरू राहणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com