Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापंतप्रधानांच्या हस्ते निओ मेट्रोचे ऑनलाईन उद्घाटन?

पंतप्रधानांच्या हस्ते निओ मेट्रोचे ऑनलाईन उद्घाटन?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) पुण्यात ( Pune ) एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. तेथूनच नाशिकच्या मेट्रोचे देखील उद्घाटन होणार असल्याची शक्यता आहे. ( Nashik Metro is also likely to be inaugurated ). याबाबत नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी ( Mayor Satish Kulkarni ) यांनी पक्षाकडे तशी मागणी केली असल्याचे समजते. मात्र पक्षाच्या वतीने याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर 2018 रोजी नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शहरात मेट्रोचे सर्वेक्षण करण्याचे काम सिडको आणि महामेट्रोकडून करण्यात आले. नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी ताशी 20 हजार प्रवासी क्षमता उपलब्ध नसल्याने एलीव्हेटेड टायरबेस मेट्रो चालविण्याची शिफारस महामेट्रोने केली होती. त्यानुसार टायरबेस मेट्रो सेवेसाठी दिल्ली येथील राईटस कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले.

ऑगष्ट 2019 मध्ये मेट्रो निओ असे प्रकल्पाचे नामकरण करण्यात आले. त्यानंतर केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला. 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मेट्रो निओ प्रकल्पासाठी 2092 कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली. या प्रकल्पासाठी 2100. 6 कोटी खर्च येणार असून राज्य सरकार, सिडको व महापालिकेचा वाटा 255 कोटींचा असणार आहे.

केंद्र सरकार 707 कोटी रुपये तर 1,161 कोटी कर्ज स्वरूपात उभारले जाणार आहे. करोनाचा अडथळा आला नसता तर आतापर्यंत एजन्सी नियुक्त होऊन प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली असती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेट्रो निओचा प्रकल्प आवडल्याने वाराणसी या त्यांच्या मतदारसंघात प्रकल्प होण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहे.

नाशिक मेट्रोसाठी 2023 ची डेडलाईन होती, परंतु अद्यापपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी न मिळाल्याने काम सुरू झाले नाही. त्यामुळे आता मार्च महिन्यात उद्घाटन झाल्यास वर्षभर प्रकल्प लांबणीवर पडणार आहे. केंद्र सरकारच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) कडून पहिल्या कॉरिडॉर 36 व दुसर्‍या कॉरिडॉरसाठी 14, असे एकूण पन्नास डब्याचे (कोच) डिझाईन, उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक शहराचा चौफेर विकास व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याचे सांगितले होते, तो शब्द आम्ही पाळला आहे. नाशिकला बस सेवा सुरू केली तसेच आयटीपार्क उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले आहे. त्याचप्रमाणे नमामि गोदेसाठी केंद्राकडून सुमारे दोन हजार कोटी रुपये मंजूर करून आणले आहे, तर महापालिकेच्या भूखंडांचा विकास बीओटी तत्वावर होणार आहे. त्याचप्रमाणे नियो मेट्रोचे उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वेळ मिळावा, अशी मागणी केली आहे.

– सतीश कुलकर्णी, महापौर नाशिक Satish Kulkarni- Mayor, Nashik

- Advertisment -

ताज्या बातम्या