करोनात नाशिक मनपाची सरस कामगिरी; ‘ऑनलाईन शिक्षण आपल्या दारी’

नाशिक । प्रतिनिधी

करोना विषाणु संसंर्गाचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला असुन अजुनही संंक्रमण सुरू आहे. अशा स्थितीत शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणुन शासनांतर्गत ‘ऑनलाईन शिक्षण आपल्या दारी’ या उपक्रमानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे….

यात नाशिक महानगरपालिकेकडुन 20 हजार 298 विद्यार्थ्यार्ंना व्हॉट्स अ‍ॅप, टीव्हीद्वारे व स्वंय अध्ययन अशाप्रकारे शिक्षण देत यशस्वी कामगिरी सुरू ठेवली आहे. शिक्षणाबरोबरच करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी सर्व्हेचे जोखमीचे काम करित शिक्षक दुहेरी जबाबदारी पार पाडत आहे.

राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यातील स्थिती लक्षात घेता शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भातील निर्णय पुढ सरकला गेला आहे.

असे असले तरी घरात राहुन ऑनलाईन शिक्षणासंदर्भात शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नाशिक महापालिका शिक्षण विभागाकडुन 27 हजार 737 पैकी 20 हजार 298 विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे अभ्यासक्रम शिकविण्यास काम सुरु झाले आहे.

याकरिता शिक्षकांची दोन पथकाद्वारे हे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकांच्या शाळेत प्रवेशांची प्रक्रिया ऑनलाईन सुरू झालेली असल्याने आता उपलब्ध सोयी सुविधानुसार महापालिकेकडुन शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमावर भर दिला जात आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या 90 शाळांतून 27 हजार 737 विद्यार्थी शिक्षण घेत असुन गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे प्रयत्न शिक्षण विभागाकडुन केले जात आहे.

यंदाचे नवीन शैक्षणिक वर्ष करोना विषाणु साथीच्या पार्श्वभूमीवर संकटात सापडले असले तरी राज्य शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन शिक्षण देण्याची प्रक्रिया महापालिका शिक्षण विभागाकडुन सुरू झाली आहे.

नाशिक मनपा शिक्षण विभागाकडुन विद्यार्थ्यांना ऑनलाईन देण्यासाठी शिक्षकांच्या एका पथकाने प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम एका स्टुडिओ मध्ये इयत्ता व विषय निहाय शैक्षणिक व्हिडीओ निर्मीती केली आहे.

दुसर्‍या पथकाने हा शैक्षणिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यापर्यत पोहचविण्याचे व्हॉटस अ‍ॅप, टीव्ही व स्वयंअध्यंयन याद्वारे हे काम सुरु केले आहे.

यात पहिली व दुसरीचे वर्ग सोडून वर्गनिहाय व अभ्यासक्रमानिहाय दिलेल्या वेळेत अभ्यासक्रम देण्यात येत आहे. 23 ऑगस्ट 2020 रोेजी ऑनलाईन विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आल्यानंतर यात 4 हजार 377 विद्यार्थी सहभागी झाले होते.

तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अ‍ॅड्रॉईड फोन नाही अशा 4 हजार 500 विद्यार्थ्यांनासाठी मिसकॉलद्यारे संपर्क साधल्यास त्यांना ऑडीओ स्वरुपात अभ्यासक्रम ऐकायला मिळत आहे. अशाप्रकारे एकुण 20 हजार 298 विद्यार्थी ऑनलाईन सर्वच विषयाच अभ्यासक्रम शिकत आहे.

तसेच पहिली व दुसरीत असलेल्या विद्यार्थ्यांना कृती आधारित कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांचे आई – वडील, भाऊ बहिण यांची मदत घेतली जात आहे. एकुणच करोनाच्या पार्श्वभूमीअशाप्रकारे ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविला जात आहे.