Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानवरात्रोत्सवात ऑनलाईन दर्शन सुविधा

नवरात्रोत्सवात ऑनलाईन दर्शन सुविधा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना संकटामुळे यंदा कालिका देवी, सप्तश्रृंगी देवी आणि रेणुका देवीसह जिल्ह्यात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणारे सर्वच यात्रा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे. भाविकांनीही ऑनलाईनद्वारेच दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातही साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेली वणी येथील श्री सप्तश्रृंगी देवी, तसेच कालिका देवी, रेणुका देवी या देवस्थांनांच्या ट्रस्टींनी थेट ऑनलाईन दर्शनाची सुविधा आता भाविकांसाठी उपलब्ध केली आहे.

मंदीरांची प्रवेश द्वारच भाविकांसाठी बंद राहतील. शिवाय मंदीराबाहेर पोलीस बंदोबस्तही राहाणार आहे. त्यामुळे कुणालाही मंदीरात जाऊन दर्शन घेता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही स्थितीत थेट मंदीरात येऊ नये.

दुसर्‍या बाजूने सप्तश्रृंगी गडावर खासगी वाहनांना परवानगी नाही. त्यामुळे स्थांनिकांना गडावर जाण्यासाठी पासेस दिले असून, त्यांनी भाविकांची वाहतूक केल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

कालिका देवीचे दर्शन ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मंदीरात युट्युब चॅनेलने नागरिकांना लाईव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पहाटे 4 वाजेची आरती केवळ दाखविली जाणार नसून, 7 वाजेपासून रात्री उशीरापर्यंत थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. मंदिरात रोज पाच पेक्षा जास्त लोकांना प्रवेश नसेल.

– केशव आण्णा पाटील, अध्यक्ष, कालिका देवी मंदीर ट्रस्ट

सर्वच देवस्थांनांना यात्रा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पण त्यांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना मी बैठक घेऊन दिल्या आहेत. सर्वच ठिकाणी तशी व्यवस्था करण्यात आली.सप्तश्रृंगी गडावर भाविकांना अजिबात परवानगी देण्यात आली नाही. वाहनांनी परवानगी देण्यात आली नाही. गडावर राहणार्‍या नागरिकांना पासेस देण्यात आले असून, त्यांनी भाविकांची वाहतूक केल्यास कारवाई केली जाणार आहे.

– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या