कांदा दरात घसरण

कांदा दरात घसरण

लासलगाव। वार्ताहर Laslgaon

केंद्राच्या परवानगी नंतर व्यापार्‍यांनी इराण (Iran), तुर्की (Turkey), अफगाणिस्थानसह (afghanistan) इतर देशातील कांदा आयात (Onion import) करताच आशिया खंडातील (Asia continent) प्रमुख काम बाजार समिती असलेल्या लासलगाव (lasalgaon) कृषी उत्पन्न बाजार समिती (agricultural produce market committee) मध्ये एका दिवसात कांद्याच्या कमाल दरामध्ये 500 रुपयांची घसरण तर सरासरी दरांमध्ये 350 रुपयाची घसरण पहायला मिळाली.

सलग दुसर्‍या दिवशी कांद्याच्या दरामध्ये घसरण झाल्याने शेतकरी (farmers) वर्गामध्ये अस्वस्थता पसरली आहे. दोन दिवसात जवळपास कांदा दर 600 रुपयांनी कोसळले आहे. कांद्याचे वाढते बाजारभाव येणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly elections) डोकेदुखी ठरू नये यासाठी केंद्र सरकारने (Central Government) पारंपारिक अस्त्र काढत आयकर (Income tax) धाडी, बंफर स्टॉकची एक लाख मेट्रिक टनाहून अधिक शहरी बाजारपेठेत विक्री, कांदा आयात करत भाव स्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे.

तर दुसरीकडे शेतमालातून दोन पैसे मिळतील या उद्देशाने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी उन्हाळ कांदा (summer onion) चाळीत साठवून ठेवला होता. बदलत्या वातावरणामुळे कांद्याच्या वजनात, प्रतवारीत घट झाली. त्यातही मिळणार्‍या भावातून कुठेतरी झालेला खर्च निघून दोन पैसे शेतकर्‍यांना मिळणार होते. मात्र आता त्यांच्या पदरी निराशा आली आहे. शहरी ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने कांद्याचे भाव पाडण्यात यश मिळविले आहे.

शेतकरी वर्गाने महागडी बियाणे, औषधे, खते वापरून तसेच रात्रीचा दिवस करून मोठी मेहनत घेत कांदा पिकविला. मात्र आता दोन दिवसातच कांद्याच भावात 600 रुपयांनी घसरण झाल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान 1000 कमाल 2712 रुपये तर सरासरी 2300 रुपये भाव मिळाला आहे. कांद्याचे कोसळते दर डोकेदुखी ठरत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com