केंद्राने बफर स्टॉकमधील कांदा आणला बाजारात, दर कमी होणार


केंद्राने बफर स्टॉकमधील कांदा आणला बाजारात, दर कमी होणार

किरकोळ बाजारात ४० रुपये किलोवर गेलेला कांदा स्वस्त (Onion Rate)करण्यासाठी आता केंद्र सरकार पाऊल उचलले आहे. केंद्र सरकार बफर स्टॉकमधला (buffer stock)१.११ लाख टनापेक्षा जास्त कांदा बाजारात आणला आहे. त्यामुळे कांद्याचे दर (Onion Rate) ५ ते १२ रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.


केंद्राने बफर स्टॉकमधील कांदा आणला बाजारात, दर कमी होणार
सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

केंद्र सरकार बफर स्टॉकमधील कांदा महाराष्ट्र (Maharashtra) मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि गुजरातमधील (Gujarat) मधील स्थानिक बाजारपेठेत आणण्यात आला. तसेच बफर स्टॉकमधील कांदा दिल्ली, कोलकाता, लखनौ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, मुंबई, चंदीगड, कोची आणि रायपूर या प्रमुख बाजारपेठांमध्ये पाठवण्यात आला. २ नोव्हेंबरपर्यंत बफर स्टॉकमधून एकूण १.११ टन कांदा प्रमुख बाजारपेठेत आणण्यात आला होता. मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या हस्तक्षेपामुळे आतापर्यंत किरकोळ किमती ५-१२ रुपये प्रति किलोने कमी झाल्या आहेत.


केंद्राने बफर स्टॉकमधील कांदा आणला बाजारात, दर कमी होणार
माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com