कांद्याचा लिलाव चौथ्या दिवशीही बंद : मुंबईत आज बैठक

नाशिक

केंद्र सरकारने घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन, तर किरकोळ व्यापार्यांना २ टन कांदा साठवणुकीची मर्यादा लादल्याने नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून पुकारलेला बंद चौथ्या दिवशीही बंद होता. काल बुधवारी शरद पवार यांनी लिलाव सुरु करण्याचे आवाहन केल्यानंतर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

केंद्र सरकारने व्यापाऱ्यांवर कांदा साठवणुकीचे निर्बंध लादले. त्यामुळे सोमवार (ता. २६) पासून व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पुकारला. तो चौथ्या दिवशीही कायम होता. काल बुधवारी शरद पवार नाशिक दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी लिलाव सुरु करा, आपण केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊ, असे सांगितले. परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही.

दरम्यान कृषीमंत्री दादा भुसे दुपारी ४ वाजता मुंबईत व्यापाऱ्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीत तोडगा निघून लिलाव सुरु होतो का? याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.