लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद

लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद

नाशिक |मनमाड|लासलगाव Nashik, Manmad, Lasalgaon

केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आज नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजारसमित्यांमध्ये कांदा लिलाव बंद आहेत.

केंद्राकडून मोठ्या व्यापाऱ्यांना २५ टनापेक्षा अधिक कांदा साठवणूक करून न ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास नकार दर्शिवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ बाजारसमित्या आणि चार उपबाजारात लिलाव पूर्णपणे बंद आहेत.

लासलगाव, मनमाड सह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यात कांदा लिलाव बंद..शेतकऱ्यांची होतंय मोठी गैरसोय

जिल्ह्यात बाजारभाव सात ते आठ हजारांच्या पार गेले असतानाच अचानक केंद्राने कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्यामुळे काही ठिकाणी बाजार भाव घसरले होते. आज मात्र जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या बंद असून एकही व्यापाऱ्याने लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला आहे.

अनेक वाहने शेतकऱ्यांनी बाजारसमितीतून घरी नेले आहेत. कांद्याला चांगला बाजार असताना केंद्राच्या या निर्णयामुळे लिलाव न झाल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com