Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यालाल कांद्याची उसळी, उन्हाळ कांदाही वधारला

लाल कांद्याची उसळी, उन्हाळ कांदाही वधारला

लासलगाव | वार्ताहर

गेल्या आठवडाभर नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांना दिवाळीच्या निमित्ताने सुट्ट्या होत्या. अजूनही काही बाजार समित्या बंद अवस्थेत असून लवकरच याठिकाणी लिलाव प्रक्रिया सूरू होणार आहेत….

- Advertisement -

आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये आजपासून लिलाव प्रक्रिया सुरु झाली. संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आजच्या कांदा भावांकडे होते. यामध्ये आज लाल कांद्याने अभूतपूर्व उसळी घेतलेली दिसून आली तर उन्हाळा कांदादेखील काहीसा वधारल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

आजच्या बाजारसमितीने दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ कांदयाचे बाजारभाव स्थिर आहेत. आज कांद्याचा किमान भाव १३०० तर कमाल ४५०१ राहिला. सरासरी ३७०० रुपये दराने कांद्याची विक्री झाली. आजच्या कमाल भावात ४०० रुपयांची वाढ झालेली दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, नुकताच बाजार येऊ घातलेला लाल कांदा (पावसाळी कांदा) बाजारात दाखल होऊ लागला आहे. आज लाल कांद्याला ३००१ रुपये किमान तर कमाल ५१०० रुपये प्रती क्विंटल तर सरासरी ४६०० रुपये प्रमाणे कांदा विक्री झाला.

यादरम्यान, किमान भावात १६५० तर कमाल भावात १२०० रुपयांची वाढ झाल्याने नव्याने बाजारसमितीत दाखल होऊ घातलेल्या लाल कांद्यालाही चांगला बाजारभाव मिळाल्याने बळीराजाला मोठी आशा या उत्पन्नातून आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभाव

उन्हाळ कांदा आवक अंदाजे ४२०० क्विंटल (३५० नग)

लाल कांदा आवक अंदाजे २५० क्विंटल (२५नग)

बाजारभाव रूपये प्रति क्विंटल

(किमान-कमाल-सर्वसाधारण)

उन्हाळ कांदा – १३०० – ४५०१ – ३७००

लाल कांदा – ३००१ – ५१०० – ४६००

मका – १२४६ – १५१६ – १४२१

सोयाबीन – ३००० – ४३२६ – ४२६१

गहू – १६०० – १६४६ – १६१२

बाजरी – १०८० – १२११ – ११४०

हरभरा – ४५०० – ४७०० – ४६००

मुग – ४००० – ७५०० – ५२००

- Advertisment -

ताज्या बातम्या