Thursday, April 25, 2024
Homeनाशिकचार दिवसानंतर कांद्याचा लिलाव सुरु : मिळाला हा दर

चार दिवसानंतर कांद्याचा लिलाव सुरु : मिळाला हा दर

लासलगाव । वार्ताहर

लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलावाचा तिढा गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादा भुसे आणि व्यापारीवर्ग यांच्यात झालेल्या बैठकीत सुटला होता. त्यानंतर आज शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरु झाला.

- Advertisement -

केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर लावलेल्या मर्यादेमुळे गेल्या चार दिवसांपासून कांदा बाजारपेठ ठप्प होत्या. गुरुवारी वर्षा निवासस्थानात झालेल्या बैठकीला कांदा लिलाव शुक्रवारपासून पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शुक्रवारी लिलाव सुरु झाला.

सोमवारपासून कांदा लिलाव बंद होता. शुक्रवारी सकाळी लासलगाव बाजार समितीत ५० वाहने लिलावासाठी आली होती. कांद्यास किमान दर ५१०० तर कमाल दर ५९०० मिळाला. सरासरी दर ५१०० रुपये राहिला.

शनिवारी कांद्यास किमान दर ५३०० तर कमाल दर ५८०० मिळाला होता. सरासरी दर ५३०० रुपये राहिला होता.

गेल्या चार दिवसांपासून कांदा बाजार बंद असल्याने याचा थेट परिणाम हा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दिसून येत होता. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 40 ते 50 छोट्या – मोठ्या गावातील शेतकरी हे लिलावासाठी दाखल होतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या