Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात उद्या पासून कांदा लिलाव बेमुदत बंद

जिल्ह्यात उद्या पासून कांदा लिलाव बेमुदत बंद

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

कांदा दर वाढीच्या भीतीने केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क लादल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी, निर्यातदारांची बैठक असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांच्या अध्यक्षतेखाली येथे झाली नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी व निर्यातदार बैठकीस उपस्थित होते.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

केंद्र सरकारने शनिवारी शुल्क वाढीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी हितासाठी व्यापार्‍यांनी आज बंद चा निर्णय घेतला ही माहिती शेतकर्‍यांपर्यंत उशिरा पोहोचणार असल्याने जर उद्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आली तर त्याचा लिलाव काढून त्यानंतर बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्र सरकारच्या जाचक अटीमुळे शेतकर्‍यांच्या अनेक संघटनांच्या विनंतीनुसार सदरचा बेमुदत बंद चा निर्णय व्यापारी वर्गाने घेतला असून या बैठकी बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली या बैठकीत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे,सोहनलाल भंडारी,नीतीन ठक्कर,नितीन जैन,मनोज जैन,नंदकुमार डागा,नंदकुमार अट्टल,रिकबचंद ललवाणी, नितीन कदम,भिकाजी कोतकर,रामराव सूर्यवंशी,दिनेश देवरे,पंकज ओस्तवाल यांच्यासह जिल्ह्यातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क 40 टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे . केंद्र सरकारची अधिसूचना निघण्याअगोदर अनेक निर्यातदार व्यापार्‍यांचा मोठ्या प्रमाणात कांदा हा निर्यातीसाठी रवाना झाल्याने रस्त्यातच हा माल अडकला आहे याचा मोठ्या प्रमाणात फटका व्यापार्‍यांना बसणार आहे असे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या