ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग

ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरचे अरबी समुद्रात  इमर्जन्सी लँडिंग

मुंबई । Mumbai

येथील अरबी समुद्रात (Arabian Sea) तेल आणि नैसर्गिक वायू कॉर्पोरेशन लिमिटेडच्या हेलिकॉप्टरचे (ONGC helicopter) आपत्कालीन लँडिंग (Emergency landing) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे...

याबाबत ओएनजीने (ONGC) ट्विट केले असून या हेलिकॉप्टरमधून एकूण ९ जण प्रवास करत असल्याची माहिती दिली आहे. तसेच यामध्ये ७ प्रवासी आणि २ वैमानिकांचा समावेश असून या हेलिकॉप्टरचे मुंबईतील हाय येथील ओएनजीसी (ONGC) रिग सागर किरण जवळ अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे.

दरम्यान, यातील पाच जणांना वाचवण्यात यश आले असून बचाव कार्य सुरू आहे. तसेच तटरक्षक जहाज (Coast Guard ships) घटनास्थळी पोहोचण्यासाठी वळविण्यात आले असून बचाव कार्यात सामील होण्यासाठी आणखी एक जहाज मुंबईहून रवाना झाल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com