Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यालाचखोर अभियंत्याला सक्तमजुरी

लाचखोर अभियंत्याला सक्तमजुरी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नवीन वीज जोडणी देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून २४ हजार रुपयांची लाच मागितली होती .

- Advertisement -

वीज वितरण कंपनीच्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. पांडेय यांनी १ वर्षाचा कारावास व दोन हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे लाचखोरांना मोठा धडा मिळाल्याच्या भावना अधिकार्‍यानी व्यक्त केल्या आहेत.

दीपक उल्हास चौधरी असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. जेलरोड येथील तक्रारदार एका हौसिंग सोसायटीचे चेअरमन असून त्यांच्या सोसायटीत ८ नविन वीज जोडणी करायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी जुलै २०१६ रोजी वीज वितरण कंपनीसोबत संपर्क साधला.

त्यावेळी चौधरी याने तक्रारदाराकडे २४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. विभागाने तक्रारीची शहानिशा करुन सापळा रचला. तसेच २१ जुलै २०१६ रोजी लाचेची रक्कम स्विकारताना चौधरी यास रंगेहाथ पकडले.

त्याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. चौधरी यांच्याविरोधात गन्हा शाबित झाल्याने न्यायालयाने त्यांना १ बर्ष सक्तमजुरी व हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील योगेश कापसे यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या