Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यालसीकरणाचा पहिला बर्थडे आज; अशी राहिली आकडेवारी

लसीकरणाचा पहिला बर्थडे आज; अशी राहिली आकडेवारी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना महामारीचा Corona सामना करण्यासाठी जगभरात अनेक प्रयत्न सुरु होते. त्या प्रयत्नांना कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीनCovshield and covaxin या दोन लसींच्या माध्यमातून आशेचा किरण दिसू लागला. लसीच्या सर्व प्रकारच्या चाचण्या आटोपून देशभरात 16 जानेवारी 2021 रोजी लासिकारणाला सुरुवात झाली.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 71 लाख 94 हजार लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. राज्यात लसीकरणाच्या बाबतीत नाशिक जिल्ह्याचा क्रमांक मुंबई, पुणे ठाण्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे.

गेल्या वर्षभरात सर्वप्रथम जिल्ह्यातील करोना काळात फ्रंटलाईनवर काम करणार्‍या आरोग्य कर्मचारी, पोलीस विभाग यांचे लसीकरण करण्यात आले होते. यात आजपर्यंत 1 लाख 93 हजार 735 लसींची मात्रा आरोग्य व इतर कर्मचारी यांनी घेतली होती. तर 1 लाख 74 हजार 939 लसींची मात्रा आरोग्य व इतर फ्रंट लाईन वर्कर यांनी घेतली आहे.

जिल्ह्यात 9 लाख 21 हजार 239 लसींची मात्रा 45 ते 60 या वयोगटातील नागरिकांनी घेतली असून 6 लाख 36 हजार 467 दुसर्‍या लसीची मात्रा घेतली आहे. जिल्ह्यात 60 वर्षाच्या पुढील पहिल्या लसीची मात्रा 6 लाख 25 हजार 735 तर दुसर्‍या लसीची मात्रा 4 लाख 22 हजार 582 एवढी आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी 26 लाख 12 हजार 32 एवढ्या पहिल्या लसीची मात्रा घेतली असून 14 लाख 54 हजार 603 नागरिकांनी दुसर्‍या लसीची मात्रा घेतली आहे.

अशाप्रकारे आजपर्यंत जिल्ह्यात 44 लाख 84 हजार 456 एवढ्या पहिल्या लसींची मात्रा तर 26 लाख 89 हजार 976 एवढ्या दुसर्‍या लसींची मात्रा जिल्ह्यात देण्यात आली आहे. बुस्टर मात्रेची संक्ख्या 19 हजार 487 एवढी झाल्याने जिल्ह्यात एका वर्षात 71 लाख 93 हजार 919 लसींची एकूण मात्रा देण्यात आलेली आहे.

कोविडशी दोन हात करताना कोणताही ठाम इलाज नसल्यामुळे सर्व जग अक्षरशः घायकुतीला आलेले असताना भारतात आपल्या स्वतःच्या लसीचे आविष्करण होऊन अल्पावधीत आपण जगातील कोणत्याही देशापेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले. कोविड वर कोणताही इलाज दृष्टीपथात नसताना लसीचे हे चिलखत आपल्याला पुढील काळातही या विषाणूचा सामना करण्याकरता उपयोगी ठरेल यात शंका नाही..

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या