औरंगाबादेत एकतर्फी प्रेमातून हत्या : संशयिताच्या लासलगावमध्ये आवळल्या मुसक्या

पोलीस अधीक्षक पाटील यांच्या पथकाने केली कारवाई
औरंगाबादेत एकतर्फी प्रेमातून हत्या : संशयिताच्या  लासलगावमध्ये आवळल्या मुसक्या

लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon

काल शनिवारी दुपारी औरंगाबाद (Aurangabad) येथे एकतर्फी प्रेमातून हत्या (Murder) केलेल्या आणि फरार झालेल्या शरण सिंग सविंदर सिंग शेटी (Sharan Singh Savinder Singh Shetty) (20) या संशयितास लासलगाव (Lasalgaon) येथील गणेश नगर भागातून अटक (Arrested) करण्यात आली आहे....

संशयिताला त्याच्या बहिणीच्या घरातून पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil), अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकाने गुप्तता पाळत आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही तासातच अटक करून आरोपी औरंगाबाद पोलिसांच्या (Aurangabad Police) ताब्यात देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी, की वेदांतनगर पोलीस कार्यालयात काल सुखप्रीत कौर उर्फ कशिश प्रतिपाल ग्रंथी या कॉलेज युवतीचा एकतर्फी प्रेमातून शस्त्राने वार करून शरण सिंग सविंदर सिंग शेटी याने वार करून खून केला होता.

याबाबत औरंगाबाद पोलीस आयुक्तलायातील वेदांतनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल काल झाली होती. या खुनानंतर शरण सिंग सविंदर सिंग शेटी हा फरार झाला होता. या फरारी संशयिताचा शोध पोलीस यंत्रणा तातडीने करत होती.

याबाबत पोलीस आयुक्तलयातील वेदांतनगर पोलीस कार्यालयाचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना संशयित आरोपी लासलगाव येथील त्याचे बहिणीकडे आला असल्याची माहिती दिली होती.

त्यानुसार खबर मिळताच गुप्तता पाळत तातडीने पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे व लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस अंमलदार योगेश शिंदे, हवालदार संदीप शिंदे विजय बारगल यांच्या पथकाने दुपारी दोन वाजेच्या सुमारास लासलगाव येथील श्री गणेशनगरमधील गणेश मंदिरामागे त्याच्या बहिणीच्या घरात छापा टाकला.

यात फरार असलेला शरण सिंग सविंदर सिंग शेटी (Sharan Singh Savinder Singh Shetty) यास ताब्यात घेतले. याबाबत औरंगाबाद पोलिसांना कळविताच औरंगाबाद पोलिसांचे पथकाने लासलगाव येथे दाखल झाले आणि आरोपीस ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com