Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये कॉंग्रेस काढणार ७५ किलोमीटरची पदयात्रा

नाशिकमध्ये कॉंग्रेस काढणार ७५ किलोमीटरची पदयात्रा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या (National Congress) चिंतन शिबिरात ‘ एक व्यक्ती एक पद’ (one person one post) संकल्पना राबविण्याचा निर्णय झाल्यानंतर याचे पडसाद नाशिक जिल्हा पातळीवर देखील उमटले आहेत. ज्या व्यक्तींकडे दोन पदे आहे. त्यांनी स्वत:हून पुढे यावे. एक पद सोडून दुसऱ्या कार्यकर्त्यांस संधी द्यावी,असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले….(Rajaram Pangavhane)

- Advertisement -

तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणी करून जिल्हापातळीपासून गावपातळीपर्यंत पक्ष मजूबत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणीसाठी जिल्हा कॉंग्रेसची बैठक गुरूवारी (दि.२६) जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे (Congress President Dr Tushar Shewale) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत पानगव्हाणे यांनी काँग्रेसच्या झालेल्या चिंतन शिबिरानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवीन उर्जा आली आहे. संघटनात्मक बांधणीसाठी या शिबिरातुन पक्ष गाव ते देश पातळीवर भक्कम करण्यासाठी तयारीला लागला असल्याचे सांगितले. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश पदाधिकारी प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.

नवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून डिजिटल सभासद नोंदणी, बुथ, ब्लॉक, जिल्हा, राज्य, देश हया संघटनात्मक बांधणीसाठी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लवकरच प्रदेश पातळीवर एका शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.

जिल्हा पातळीवर देखील असे शिबिर होणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याने जिल्हा मध्ये ७५ कि.मी. पद यात्रा काढण्यात येणार आहे या पदयात्रेत मंत्री, प्रदेश पदाधिकारी सहभागी होणार आहेत. याची तारीख लवकरच कळवली जाणार असल्याचे डॉ. शेवाळे यांनी सांगितले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी कामाला लागण्याचे सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस माजी आमदार अनिल आहेर, प्रा. अनिल पाटील, गोपाळ लहामगे, ज्ञानेश्वर काळे, गुणवंत होळकर, बाळासाहेब कुक्कडे, रौफ कोकणी, अल्तमेश शेख, किशोर कदम , किरण जाधव,अ‍ॅड समीर देशमुख, विनायक सांगळे, समाधान पाटील, संजय जाधव, डॉ राजेंद्र ठाकरे, सुनील आव्हाड, साखरचंद कांकरिया, प्रशांत बाविस्कर, सखाराम भोये, रमेश जाधव, विशाल जाधव, महेंद्र हिरे यांसह तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचलन रमेश कहांडोळे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या