Thursday, April 25, 2024
Homeनाशिकअथक प्रयत्नाअंती बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती; 'पाहा' थक्क करणारा व्हिडीओ...

अथक प्रयत्नाअंती बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती; ‘पाहा’ थक्क करणारा व्हिडीओ…

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

चिंचवड येथील तरुण विजय बच्छाव यांचा रोकडोबा बंधारा (Rokdoba Weir) येथे पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. अथक प्रयत्नाअंती या तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे…

- Advertisement -

घटनेची माहिती पवन हिरे (Pawan Hire) यांना मिळताच त्यांनी तत्काळ नगरसेवक गिरीश बोरसे यांच्याशी संपर्क साधला. नगरसेवक गिरीश बोरसे (Girish Borase) यांनी किल्ला तैराक ग्रुपला घटनेसंदर्भात माहिती दिली.

Video : …तर राऊतांना आमच्या शुभेच्छाच; भुजबळांनी सांगितला अनुभव

किल्ला तैराक ग्रुपचे सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. दहा युवकांच्या ग्रुपने अर्धा तास पाण्यामध्ये परिश्रम करून मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्याने या ग्रुपच्या सदस्यांचे नागरिकांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या