या प्रश्नाच्या उत्तराने हरनाज झाली मिस युनिव्हर्स

या प्रश्नाच्या उत्तराने हरनाज झाली मिस युनिव्हर्स

भारताच्या हरनाज संधूने मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) चा खिताब जिंकला आहे. भारताला २१ वर्षांनंतर हे विजेतेपद मिळाले आहे. ८० देशांतील मुलींना हरवून मिस युनिव्हर्स २०२१ स्पर्धा जिंकली आहे.

या प्रश्नाच्या उत्तराने हरनाज झाली मिस युनिव्हर्स
Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

इस्रायलमधील इलात येथे काल (रविवारी) 70 वी ‘मिस युनिव्हर्स’ (Miss Universe 2021) स्पर्धा पार पडली. त्यात 80 देशांतील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. मात्र, त्यातूनही ‘टाॅप-3’मध्ये स्थान मिळविण्यात हरनाज यशस्वी ठरली होती. नंतर पॅराग्वे अन् दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत हरनाजने हा मुकूट जिंकला.

या प्रश्नाच्या उत्तराने हरनाज झाली मिस युनिव्हर्स
हरनाज संधू मिस युनिव्हर्स : 21 वर्षानंतर भारताकडे मुकूट

हरनाजला विचारण्यात आले होते की, दबावाचा सामना करणाऱ्या महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल?

या प्रश्नाच्या उत्तरात हरनाज म्हणाली, ‘आजच्या तरुणाईवर सर्वात मोठे दडपण म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. तुम्ही अद्वितीय आहात आणि तेच तुम्हाला सुंदर बनवते, हे समजून घ्या. स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. स्वतःसाठी बोला, कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात. तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज इथे उभी आहे.’तिचे हे उत्तर ऐकून उपस्थित प्रेक्षकांसह सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com