Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या‘नगररचना परियोजना’ प्रसिद्ध

‘नगररचना परियोजना’ प्रसिद्ध

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा असलेल्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पाची नगररचना परियोजना मनपाच्या विशेष महासभेने शेतकरी व जागा मालकांना पाहण्यासाठी प्रसिद्ध केली आहे.

- Advertisement -

प्रारुप योजना प्रसिध्द झाल्यापासुन 30 दिवसांच्या कालावधीत बाधीत व्यक्तींकडून कुठल्याही स्वरुपाची योजनेसंदर्भातली हरकत नोंदविता येणार आहे. प्राप्त मुदतीत आलेल्या हरकती विचारात घेवून योजनेत आवश्यक बदल करुन योजना मंजूरीसाठी शासनाकडे सादर केली जाणार आहे.

नाशिक महानगरपालिका हद्दीत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रारुप नगररचना योजना नाशिक-मखमलाबाद करण्याचा कच्चा मसुदा तयार करण्यात आला आहे.

योजनेअंतर्गत समाविष्ट जागा मालकांना दि. 4 जानेवारी 2020 रोजी विशेष सभा आयोजित करुन मसुदा दाखविण्यात आला होता. त्यावर जागा मालकांनी दिलेल्या सूचना व हरकतींचा विचार करुन योजनेच्या कच्च्या मसुदयात आवश्यक बदल करण्यात आले होते.

तयार केलेली प्रारुप योजना राज्याच्या नगररचना संचालकांकडे तांत्रिक छाननीसाठी व मंजुर सुधारीत विकास योजनेतील संभाव्य बदलांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आली होती. त्यास संचालकांनी मान्यता दिली आहे.

नाशिक महानगरपालिकेने दि. 29 सप्टेंबर रोजी महापौर सतिश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन विशेष महासभा आयोजित करून ही योजना शेतकरी व जागा मालकांना पाहण्यासाठी प्रसिध्द केली आहे.

प्रारुप योजना तयार करतांना जागा मालकांना त्यांच्या क्षेत्राच्या 55 % क्षेत्र विकसित भूखंडाच्या स्वरुपात देण्यात येणार असुन, 45 % क्षेत्र हे सार्वजनिक सुविधा, खुल्या जागा, कमी उत्पन्न गटासाठीचे क्षेत्र व योजनेतील रस्ते यासाठी प्रस्तावित आहे.

प्रारूपातील मुद्दे

* प्रत्येक अंतिम भूखंडास किमान 12 मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे.

* अंतिम भूखंड धारकास नियमावलीनुसार आवश्यक असलेले आर्थिक मागास घटकासाठी * (इडब्लूएस) 20 टक्के क्षेत्र सोडण्याची आवश्यकता नाही.

* 8 ते 12 टक्के सुविधा क्षेत्र (Amenity Space) सोडण्याची गरज नाही.

* 10 टक्के खुली जागा (Open Space) सोडण्याची आवश्यकता नाही.

* प्रत्येक अंतिम भूखंडास किमान 2.5 चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) अनुज्ञेय राहील.

* योजनेमध्ये समाविष्ट जागा मालकांना अंशदान रक्कम लागु राहणार नाही.

* स्मार्ट सुविधेसह, रस्ते, पथदिवे, पदपथे, लँडस्केप, स्ट्रीट फर्निचर, बस स्टँड, पार्किंग, अंतिम भूखंडापर्यंत पाणी पुरवठा, भूमिगत मलनिःसारण वाहिन्या व सांडपाण्याचा पुर्नवापर केलेल्या वाहिन्या इ. पायाभूत सुविधांचा समावेश असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या