इगतपुरीत शिताफीने परतवला बिबट्याचा हल्ला

इगतपुरीत शिताफीने परतवला बिबट्याचा हल्ला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

इगतपुरी शहरात पुन्हा बिबट्याने एका व्यक्तीवर (leopard attack on a man) हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत नारायण निकम (Narayan Nikam) नामक व्यक्ती जखमी झाली आहे. परिसरात बिबट्याचा संचार लक्षात घेता तातडीने याठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी केली जात आहे...

अधिक माहिती अशी की, आज पहाटे साडेपाचच्या सुमारास नारायण निकम हे रॅक पडण्याचा आवाज आल्याने काय झाले हे बघण्यासाठी पडवीत गेले होते.

निकम यांच्यावर 2 ते 3 फुटावर असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. निकम यांचा पाय फॅक्चर असतानाही त्यांनी हल्ला परतवून लावला. बिबट्याने परत झडप घातली असता रॅक त्यांच्यामध्ये आल्याने आवाज झाला.

यावेळी त्यांनी आरडा ओरडा करताच बिबट्याने धूम ठोकली. जखमी नारायण निकम यांना इगतपुरी येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा या भागात वावर दिसून येत आहेत. मात्र पिंजरा लावूनही बिबट्या पिंजऱ्यात येत नाही. इतक्या दिवस प्राण्यांची शिकार करणाऱ्या बिबट्याने मानवी वस्तीवर आगेकूच केल्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com