Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याAccident News : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन गंभीर जखमी

Accident News : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन गंभीर जखमी

नाशिक | Nashik

मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai-Nashik Highway) शनिवार (दि.०९) रोजी रात्रीच्या सुमारास कंटेनर आणि कारचा (Container and Car) भीषण अपघात (Accident) घडला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू (Death) झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे…

- Advertisement -

Nashik Road : चोरट्यांनी रकमेसह एटीएम मशीन पळविले; घटना सीसीटीव्हीत कैद

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा जवळील खडवली फाट्याजवळ (Khadvali Phata) कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनरने कारला मागील बाजूस जोरदार धडक दिली. त्यानंतर कंटेनर चालकाने कारला फरफटत नेल्याने पुढे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आईस्क्रीमच्या टेम्पोला जोरदार धडक दिली.

Accident News : सिमेंट मिक्सर ट्रकची चार वाहनांना धडक; एकाचा मृत्यू, तीन गंभीर

यावेळी आईस्क्रीम खात उभे असलेले तीन ते चार जण दुचाकीसह चिरडले गेले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी (Injured) झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारच्या मागील बाजूस कंटेनरची धडक बसल्याने सुदैवाने कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.

NCP Crisis : राज्यभरात माफी मागत फिरणार का? भुजबळांचा पवारांना खोचक सवाल

दरम्यान, या अपघातात दोन ते तीन दुचाकी आणि एक कार व आईस्क्रीमच्या टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. तर अपघातानंतर फरार झालेल्या कंटेनर चालकाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून या संपूर्ण घटनेची चौकशी पडघा पोलीस करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या