Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिवजयंतीसाठी दहा ऐवजी आता शंभर शिवभक्तांना परवानगी

शिवजयंतीसाठी दहा ऐवजी आता शंभर शिवभक्तांना परवानगी

नाशिक । प्रतिनिधी

राज्य शासनाने शिवजयंती साजरी करण्यावर करोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घातले होते, मात्र राज्यभरातील शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करीत शिथीलता देण्याची मागणी केल्याने शासनाने आज तडकाफडकी एक विशेष आदेश काढून दहा ऐवजी 100 शिवभक्तांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली.

- Advertisement -

यामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. उद्या (दि.19) शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. याची जोरदार तयारी मागील काही दिवसांपासून सुरू होती, विविध ठिकाणी भव्य कमानी उभारण्यात आल्या असून छत्रपती सेनेच्या वतीने छत्रपतींच्या टाकचे विश्वविक्रम देखील होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या