ट्रॅक्टर नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू; दोन जखमी

ट्रॅक्टर नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू; दोन जखमी

भंडारा | Bhandara

शेतातील माल घेऊन जाणारा ट्रॅक्टरला ट्रकने वाट न दिल्यामुळे ट्रॅक्टर थेट पुलावरुन 30 फुट खाली चुलबंद नदीत (Chulband River) कोसळल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथे घडली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पवनी येथे ट्रॅक्टर (tractor) शेतमाल वाहतूक करत होते, तेव्हा एका ट्रकने ट्रॅक्टरला रस्त्यावर वाट न दिल्यामुळे ट्रॅक्टरने रस्ता सोडला आणि चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक्टर थेट नदीत कोसळला. या अपघातात ट्रॅक्टरवरील एक प्रवासी जागीच ठार झाला तर, इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये आण्णा पारधी (वय 50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर राष्ट्रपाल ठाकरे (वय 50) राध्येश्याम ढोरे (वय 44) असे जखमींची नावे आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

ट्रॅक्टर नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू; दोन जखमी
MPSC उमेदवारांना मोठा दिलासा

लाखांदूर येथील शेतकरी ( farmer) राष्ट्रपाल ठाकरे यांनी आपल्या शेतातील कडधान्य बाजार समिती येथे नेण्याकरिता आपल्या ट्रॅक्टरमध्ये भरून सहकारी आण्णा पारधी व राध्येश्याम ढोरे यांच्या सोबत ट्रॅक्टरवर निघाले होते. दरम्यान, लाखांदूर-पवनी मार्गावरिल चुलबंद नदीवरील पुलावरुन समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने साइड दिली नाही.

ट्रॅक्टर नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू; दोन जखमी
मला पोलिसांनी...; महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री बॅनरवरून सुप्रिया सुळे भडकल्या

यामध्ये ट्रॅक्टर चालकाने आपला बचाव करण्यासाठी साईडला घेताना ट्रॅक्टर सरळ 30 फुट पुलावरुन आदळला. यात आण्णा पारधी (Anna Pardhi) यांचा जागीच मृत्यू झाला असून राष्ट्रपाल ठाकरे यांचा पाय मोडला आहे. राध्येश्याम ढोरे हे ही गंभीर जखमी झाले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक्टरमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढत लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात (Lakhandur Rural Hospitals) हलविले असून जखमींवर उपचार सुरु आहेत. तसेच लाखांदूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरु आहे.

ट्रॅक्टर नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू; दोन जखमी
फडणवीसांची उद्धव ठाकरेंना मैत्रीची साद; म्हणाले, आम्ही शत्रू नाही तर...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com