अंमली पदार्थ बाळगणाऱ्याला अटक

अंमली पदार्थ बाळगणाऱ्याला अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) २२४ ग्रम अफु (opium) सदृश्य अंमली पदार्थाची (narcotics) वाहतूक करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेण्यास नाशिक ग्रामीणच्या पथकाला यश आले आहे.

याबाबत नाशिक ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे (Upper Superintendent of Police Madhuri Kangane) यांना एक इसम घोटी (ghoti) ते नाशिकरोड (nashik road) दरम्यान अंमली पदार्थाची वाहतुक करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होते.

त्यानुसार कांगणे यांनी अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकातील अंमलदार यांच्यामार्फत मुंबई- आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) वाडीवऱ्हे (Vadivarhe) हद्दीतील गोंदे दुमला येथील रोडवर सापळा रचून खात्री करत असतांना मुंबई-आग्रा महामार्गावर घोटीकडून नाशिककडे एमहा कंपनीची एफ झेड मोटारसायकल क्रमांक एम एच १५ एच एक्स २५९९ येतांना दिसली.

त्यावेळी पोलिसांनी मोटारसायकल चालकाला थांबवत नाव विचारले असता त्याने दर्शन अश्विनी कुमार सोलंकी (२७) रा. श्रीरामवाडी, राखेवा हाऊस, (मूळ राहणार ८/२०७, चोपाराणी हो. बोर्ड, जोधपुर, राजस्थान) असे सांगितले. त्यानंतर त्याच्या मोटारसायकलला लाल रंगाची पिशवीअडकवलेली दिसल्याने पोलिसांनी त्यास विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिले.

त्यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले (Sub Divisional Superintendent of Police Arjun Bhosale) यांनी सदर पिशवी हातात घेतली असता तिच्यात एक लाख रुपये किंमतीचे अफु सदृष्य अंमली पदार्थ आढळून आले. यानंतर सदर इसमाविरुद्ध पोलीस नाईक संदीप हांडगे यांच्या फिर्यादीवरून वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या सुचनेप्रमाणे आणि अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, नाशिक ग्रामीण पथकातील पोलीस नाईक संदीप हांडगे, भाउसाहेब टिळे, पोलीस शिपाई कुणाल वैष्णव यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com