Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकपठ्ठ्याने थेट राज्य प्राण्यालाच ठेवले विक्रीला; नाशकातील धक्कादायक प्रकार

पठ्ठ्याने थेट राज्य प्राण्यालाच ठेवले विक्रीला; नाशकातील धक्कादायक प्रकार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कॉलेजरोडवरील (Collegeroad Nashik) एका पाळीव प्राणी (Pet Animal), पक्षी विक्रीच्या दुकानात राज्यप्राण्यालाच विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची घटना आज नाशकात घडली. दरम्यान, वन विभागाकडून हे दुकान सील करण्यात आले असून कारवाई करण्यात आली आहे….

- Advertisement -

वन विभागाच्या (Forest Department) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजरोडवरील एका पाळीव प्राणी आणि पक्ष्यांच्या विक्रीच्या दुकानात राज्यप्राणी असलेल्या शेकरूलाच विक्रीसाठी ठेवण्यात होते. याबाबतची माहिती मिळताच नाशिक पश्चिम वन (Nashik West Forest Division) विभागाच्या पथकाने या दुकानावर छापा टाकला.

वेटरचा निर्घृण खून

या कारवाईत शेकरु (Shekru) प्राणी रेस्क्यू करण्यात आले. तर दुकानमालक संशयित सौरव रमेश गोलाईत (23,रा. दसक, जेलरोड, नाशिक यास ताब्यात घेतले आहे. संशयित गोलाईत याचे कॉलेजरोडवर सौरव एक्सझोस्टिक & अक्वेटिक पेट स्टोर असे दुकान आहे.

शेकरू म्हणजे झाडावर राहणारी मोठी खारूताई. हा महाराष्ट्रचा राज्यप्राणी आहे. सदाहरित, निम सदाहरित व नदी काठच्या जंगलात आढळतो. रान आंबा, आंबाडा, किंजळ, रान बिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, फणस, चांदाडा, उंबर, इ. झाडांवर शेकरुला राहायला आवडते. याच फळांचे सेवन करून शेकरू आपली भूक भागवतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या