बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय चिमुरडी दगावली

बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय चिमुरडी दगावली

मुंबई | Mumbai

येथील गोरेगावमध्ये (Goregaon) आरे कॉलनी परिसरात (Aarey Colony Area) आज सकाळच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इतिका अखिलेश लोट (Ltika Akhilesh Lott) असे मृत मुलीचे नाव आहे. या हल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी (Forest Department Officer) आणि पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, आरे कॉलनीमधील वस्त्या, पाड्यांवर बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच ऐन दिवाळीत (Diwali) अशी दुर्दैवी दुर्घटना घडल्याने आरे परिसरात शोककळा पसरली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com