Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात दीड लाख युवा करोनाबाधित

जिल्ह्यात दीड लाख युवा करोनाबाधित

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात आतापर्यंत दीड लाख युवा (youth) करोनाबाधित (corona positive) झाले आहेत. 26 ते 40 या वयोगटातील सर्वाधिक युवकांना करोनाची (corona) बाधा झाली आहे. तर मार्च 2020 मध्ये जिल्ह्यात सर्वात पहिला बाधित आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या (corona paitent) काही ठराविक कालावधीनंतर जोरात वाढत आहे.

- Advertisement -

यासोबतच जिल्ह्यातील विविध वयोगटातील नागरिकांना या संकटाला सामोरे जावे लागले होते. यामध्ये 26 ते 40 या वयोगटातील 1 लाख 49 हजार 741 बाधित झाले होते. यामध्ये 91 हजार 260 युवक तर 58 हजार 481 युवतींचा समावेश आहे. त्याखालोखाल 41 ते 60 या वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. 1 लाख 36 हजार 107 नागरिकांमध्ये 81 हजार 585 पुरुष तर 54 हजार 522 महिलांचा समावेश आहे.

13 ते 25 या बालकांच्या वयोगटात देखील 71 हजार 298 बालके संसर्गित झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये 41 हजार 156 मुले तर 30 हजार 142 मुलींचा समावेश आहे. 0 ते 12 या लहान बालकांच्या वयोगटात 21 हजार 485 पैकी 12 हजार 13 मुलांचा तर 9 हजार 472 मुली बालकांचा समावेश आहे. तर सर्वात कमी संसर्गित वयोगट म्हणजे 61 च्या पुढील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. 33 हजार 398 जेष्ठ पुरुष तर 24 हजार 50 ज्येष्ठ महिला यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 36 हजार 79 बाधित झाले असून यामध्ये 2 लाख 59 हजार 412 पुरुष तर 1 लाख 76 हजार 667 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत करोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या 8 हजार 772 झाली असून यात 5 हजार 764 पुरुष तर 3 हजार 8 महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक मृत हे 61 च्या पुढील वयोगटातील असून त्यांची संख्या 4 हजार 280 एवढी आहे. त्यात 2 हजार 731 पुरुष तर 1 हजार 549 महिलांची संख्या आहे. त्यानंतर 41 ते 60 या वयोगटातील 3 हजार 495 रुग्ण मृत झाले असून 2 हजार 299 पुरुष आणि 1 हजार 196 महिलांचा समावेश आहे.

26 ते 40 या वयोगटातील 676 पुरुष आणि 231 महिलांचा समावेश मृतांमध्ये असून एकूण 907 मृत झाले आहेत. 13 ते 25 या बालकांच्या वयोगटात 50 पुरुष बालके आणि 30 महिला बालके यांचा समावेश आहे. तर 0 ते 12 या लहान बालकांच्या वयोगटात एकूण 10 बालकांचा समावेश असून यात 8 पुरुष बालके तर 2 महिला बालकांचा समावेश आहे. एकूणच सर्वात जास्त बाधित होणार्‍यांमध्ये तरुणांचा समावेश असला तरी मृत होणार्‍यामध्ये ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे या व्हेरीएंटपासून वाचण्यासाठी शासनाची त्रिसूत्री आणि लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांसाठी बेड सज्ज

करोनाचा (corona) विषाणू ग्रामीण भागातही (rural area) पाय पसरू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. घरीच उपचार घेऊन बरे होणार्‍या रुग्णांची संख्या अधिक वाढत असल्याने गरजू बाधित रुग्णांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी करोना केअर सेंटर्स (Corona Care Centers) (सीसीसी) आणि डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर्स (Dedicated Covid Health Centers) (डीसीएचसी) पुन्हा कार्यान्वित करण्यास सुरुवात झाली आहे.

करोनाच्या तिसर्‍या लाटेने जिल्ह्यात शिरकाव केला असून, बाधितांची संख्या पुन्हा उसळी घेत आहे. सध्या लक्षणे व फारसा त्रास नसलेले रुग्णच मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण गृहविलगीकरणात (Patient homelessness) उपचार घेऊन बरे होत आहेत. परंतु, काही रुग्णांना हॉस्पिटलमध्येच उपचार देण्याची आवश्यकता भासणार असल्याने ग्रामीण भागात कोव्हिड केअर सेंटर्स

आणि डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर्स कार्यान्वित करण्याचे आदेश घटना व्यवस्थापक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवठ्यासह बेड उपलब्धतेवर भर देण्यात येतो आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या