सप्तशृंगी गडाच्या शिखरावर किर्ती ध्वजाची परंपरा कायम

सप्तशृंगी गड
सप्तशृंगी गड

सप्तशृंगीगड । प्रतिनिधी

कोरोना विषाणू संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण महाराष्ट्र शासना मार्फत राज्यात अनलॉक असल्यामुळे सर्व धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द असल्यामुळे श्री सप्तशृंगी देवीचा नवरात्रोत्सव रद्द करण्यात येवून श्री भगवती मंदिर भाविकांना दर्शनासाठी संपूर्णत: बंद आहे.

समुद्र सपाटीपासून ४५०० फुट उंचीवर सप्तशृंगगड आहे. वर्षभरातून चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री व नवरात्रौत्सव विजयादशमीच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीच्या मध्यरात्री भगवे निशाण शिखरावर फडकविला जातो. दरेगाव येथील गवळी परिवार या ध्वज लावण्याचे मानकरी असुन गेल्या कित्येक वर्षापासुन हा अदभुत सोहळा पार पाडण्याचे काम हे परिवार करीत आहेत.

या शिखरावर जाण्यासाठी कुठुनही रस्ता नाही सरळ शिखरावर जाणे म्हणेज मुत्युला आंमञण देणे असे आहे. पण कसलीही दुखापत न होता हे कार्य गेल्या कित्येक वर्षा पासुन पार पाडत आहेत. हा सोहळा बघणे म्हणेज डोळयाचे पारणे फेडणारा सोहळा असतो. कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे भाविकांना गडावर मनाई असल्याने अत्यंत साधेपणाने पार पडला.

या ध्वजाची विधीवत पुजा देवी संस्थानचे विश्वस्त अँड. ललित निकम, बी ए कापसे, तहसिलदार, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या हस्ते करण्यात आली. या ध्वजासाठी मध्यराञी १२ वा. गवळी परिवार शिखरावर जाऊन तेथील पुजा विधी करण्यासाठी १० फुट लांब काठी, ११ मीटर केशरी कापडाचा ध्वज, पुजेसाठी गहु, तादुळ, कुंकु, हळद तसेच झेंडा घेवून जाणाऱ्या मार्गातील विविध ठिक ठिकाणी देवतांसाठी लागणारे साहित्य नैवेद्य आदिसह साहित्य घेऊन जावे लागते.

मात्र राज्यातील कोरोना संदर्भीय परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्याआदेशा प्रमाणे अत्यंत साधेपणाने सायंकाळी ६;३० वाजता देवी भगवतीच्या मंदिरात पोहचून गवळी परिवार देवीसमोर नतमस्तक होवून पुढील मार्गासाठी मार्गस्त झाले. प्रसंगी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, प्रकाश पगार, मुरली गावित, शाम पवार, प्रकाश जोशी, गोविंद निकम, भरत शेलार, गिरीधर गवळी, विपुल जहागिरदार, संदीप बेनके, राजेश गवळी, गणेश बर्डे, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील यांसह देवस्थानचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com