Friday, April 26, 2024
Homeजळगावलग्नाच्या चौथ्या दिवशीच नववधू साडेतीन लाख रुपयाचा ऐवज घेऊन फरार

लग्नाच्या चौथ्या दिवशीच नववधू साडेतीन लाख रुपयाचा ऐवज घेऊन फरार

यावल Yaval प्रतिनिधी

 नासिक येथील युवतीने येथील वाणी गल्लीतील युवकाशी लग्न करत चौथ्या दिवशीच पोबारा केला.  लग्न, लावण्यासाठी तिच्या कुटुंबियांने घेतलेले दोन लाख रुपये रोकड सह, नववधुने (new bride) घरातील कपाटातील 50 हजार रुपयांची रोकड ((Cash)) व १५ ग्रॅम सोन्याचे दागिने (Gold ornaments) अशी सुमारे साडेतीन लाख रुपयाची फसवणूक करत, नववधू फरार (fugitive) झाली आहे याप्रकरणी नववधूसह पाच जणांवर  युवकाचे फिर्यादीवरून , यावल पोलीस, स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

- Advertisement -

याप्रकरणी पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येथील वाणी गल्लीतील रहिवासी चित्तरंजन जयप्रकाश गर्गे या युवकाचे बऱ्हाणपूर येथील नातेवाईक अशोक सुधाकर जरीवाले यांनी शिर्डी येथील शीला साईनाथ अनर्थे(पाटील)  या महिलेस चित्तरंजन गर्गे यांचे साठी मुलगी पाहण्यासाठी सांगितले असता शीला अनर्थे यांनी नाशिक येथील माया संजय जोशी या मुलीच्या नाशिक येथील तिचे घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला .

मुलगी पसंत असल्याचे  गर्गे यांनी कळविल्यावर १५ जानेवारी रोजी मुलीसह तिचे कुटुंबीय व शिला अनर्थे येथील गर्गे यांचे घरी आले मुलीकडील मंडळीला मुलाचे घर आवडल्यानंतर त्यांनी मुलीचे लग्न लावून देण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली त्यापैकी त्या दिवशी ५० हजार रुपये आगाऊ रक्कम देऊन उर्वरित रक्कम लग्नाचे दिवशी देण्याचे ठरले.

त्यानंतर नाशिक येथून बऱ्हाणपूर येथे  विवाह लावण्यासाठी गर्गे यांनी पे फोन द्वारे वाहनभाडे बारा हजार रुपये   पाठवले .३० जानेवारी रोजी बऱ्हाणपूर येथील गायत्री संस्कार ट्रस्ट येथे हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे विवाह लावण्यात आला लग्न लावून ३० जानेवारी रोजी रात्री नववधूस, यावल येथे आणण्यात आले २ फेब्रुवारी रोजी येथील फालक नगरातील ब्युटी पार्लर मध्ये नववधूस पती चित्तरंजन गर्गे यांनी तिला सोडले.

आयशर आणि कारच्या धडकेत एक ठार

पार्लरमध्ये वेळ लागणार असल्याने गर्गे घरी निघून गेले पुन्हा एक तासाने नववधूस घेण्यासाठी आले असता नववधूने पार्लर मधून पलायन केले. गावात सर्वत्र शोध घेतला असता नववधू आढळून आली नाही. गर्गे यांनी तातडीने घरी जात घरचे कपाटातील वस्तूंचा शोध घेतला असता ५० हजार रुपयाची रोकड व १५ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास झाले असल्याचे लक्षात आले.

Beauty Part 3 : हिवाळा ते उन्हाळा संक्रमणासाठी आपली त्वचा सज्ज करा…

यावरून गर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात बऱ्हाणपूर येथील अशोक सुधाकर जरीवाले, शिर्डी येथील शीला साईनाथ अनर्थे, नाशिक येथील नववधू माया संजय जोशी नववधूचा भाऊ प्रकाश संजय जोशी व प्रकाश जोशी यांची पत्नी अशा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा , यावल पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आहे.

पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहेत

Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअप

- Advertisment -

ताज्या बातम्या