पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)यांच्या सुरक्षेतील कुचराईच्या प्रकरणाचे राजकीय वादळ अजूनही थांबत नाही. एकीकडे या प्रकरणावरुन काँग्रेस व भाजपात (bjp)आरोप-प्रत्यारोप सुरु असून दुसरीकडे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (supreme court)गेले आहे. तसेच पंजाबच्या चन्नी सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर त्रूटी, नेमके काय झाले पाहा फोटोमधून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांच्यासमोर मांडण्यात आले. सरन्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी घेऊ शकतो. वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी या प्रकरणाशी संबंधित जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत वरिष्ठ अधिवक्ता मनिंदर सिंग यांनी पंजाब सरकारला योग्य निर्देश देण्याची तसेच घटनेस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

चन्नी सरकारकडून चौकशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत कुचराई केल्याप्रकरणी पंजाब सरकार आता कारवाई सुरु केली आहे. पंजाब सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. तत्पूर्वी, पंजाबमध्ये पीएम मोदींचा ताफा रोखल्यानंतर बुधवारी पंजाब सरकारला विरोधकांनी घेराव घातला होता. समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल आणि प्रधान सचिव (गृह व्यवहार आणि न्याय) अनुराग वर्मा यांचा समावेश आहे. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com