Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशकोविशील्डच्या दोन डोसमधील आंतरावरुन राजकारण पेटले? जाणून घ्या कारण

कोविशील्डच्या दोन डोसमधील आंतरावरुन राजकारण पेटले? जाणून घ्या कारण

नवी दिल्ली :

देशात करोना विषाणूविरुद्ध लसीकरण मोहिमेत वापरल्या जाणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यावरून नवा वाद उभा राहिला आहे. भारत सरकारने वैज्ञानिक समूहाच्या संमतीशिवाय कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट केले’ असा धक्कादायक खुलासा सरकारच्या सल्लागार समितीच्या तीन सदस्यांनी रॉयटर्स दिलेल्या मुलाखतीत केला आहे. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक झाले. सरकारने आपली निष्क्रियता झाकण्यासाठी कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील आंतर वाढवल्याचा आरोप केला. यावर भारत सरकारकडून स्पष्टीकरणही देण्यात आले आहे.

- Advertisement -

आजपासून हॉलमार्किंग सक्तीचे, मग घरातील सोन्याचे काय होणार?

तज्ज्ञांच्या सल्लानं कोविशील्डच्या दोन डोसमधील कालावधी वाढवत असल्याचं सरकारने सांगितले होते. मात्र, अशा प्रकारचा कोणताही सल्ला आपण केंद्राला दिला नसल्याचे पॅनलमधील तीन तज्ज्ञांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं १३ मे रोजी घेतला.

दोन लसींच्या डोसमधील अंतर वाढवलं

नॅशनल टेक्निकल ऍडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनच्या (एनटीएजीआय) शिफारशीनुसार कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेत असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. ब्रिटनमध्ये करण्यात आलेलं सर्वेक्षण आणि त्यातून उपलब्ध झालेली आकडेवारी यांच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं गेलं. मात्र अशा प्रकारची शिफारस करण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचे एनटीएजीआयच्या पॅनलमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इपिडेमिओलॉजीचे माजी संचालक एम. डी. गुप्ते यांनी दिली.

राहुल गांधींची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुलाखतीनंतर सरकारवर टीका केली. टि्वट करत त्यांनी सांगितले की, देशात सर्वांचे लसीकरण झाले पाहिजे. परंतु सरकार आणि भाजप आपली निष्क्रियता लपवण्यासाठी रोज खोटे दाव करत आहे. पंतप्रधान खोटे बोलतात, ही प्रतिमा तोडण्यासाठी प्रयत्नांच्या व्हायरस वाढवत आहे.

आरोग्यमंत्र्यांचा दावा, वैज्ञानिक आधारावर निर्णय

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोविशील्डचा दोन डोसमधील आंतर वाढवण्याचा निर्णय पारदर्शकतेने घेण्यात आला आहे. यासाठी डाटाचा पृथ्वीकरण करण्यात आले. दुर्देवाने अशा महत्वाच्या विषयावर देशात राजकारण केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या