Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशचीनला ईशारा : कोणत्याही परिस्थितीसाठी भारत तयार

चीनला ईशारा : कोणत्याही परिस्थितीसाठी भारत तयार

भारताला शांतता हवी आहे. परंतु गरज पडल्यास आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. चीनला त्यांचाच भाषेत उत्तर देण्यास भारतीय लष्कर सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या भाषणात एप्रिलपासून आजपर्यंतच्या सर्व घडमोडींचा आढावा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी घेतला. ते म्हणाले, सीमेत (LAC)बदल करण्याचा चीनचा प्रयत्न आमच्या जवानांनी हाणून पाडला. आमच्या लष्कराचे मनोधर्य चांगले आहे. दुर्गम ठिकाणांवर आपले जवान सीमेवर पाय घट्ट रोवून बसले आहे. विषम परिस्थित आपले जवान कार्यरत आहेत. आमच्या जवानांनी संयम ठेऊन काम केले आहे. भारत सर्व प्रश्न चर्चेने सोडवण्यास तयार आहे.

- Advertisement -

भारत आणि चीनदरम्यान सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियातील मॉस्कोत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. तसेच संरक्षणमंत्री राजनाथसिंह ही चीनच्या संरक्षणमंत्र्यांना भेटले होते. या भेटीत दोन्ही देश सीमेवरील तणाव कमी करण्याच्या मुद्दयावर सहमत झाले. त्यासाठी एका पंचसूत्रीवर सहमती झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या