ओमायक्रॉनमुळे चिंता : राज्याची नियमावली आज, जाणून घ्या काय असतील निर्बंध

ओमायक्रॉनमुळे चिंता : राज्याची नियमावली आज, जाणून घ्या काय असतील निर्बंध

कोरोना व्हायरसचा (Corona Virus) नवीन व्हेरिएंट (New Variant) ओमायक्रॉननं (Omicron) चिंता वाढवली आहे. केरळपासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशातील 14 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे रुग्णसंख्याही वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात येत्या ख्रिसमस (Christmas) तसंच नवीन वर्षानिमित्त (New Year) नवीन निर्बंध लागण्याची शक्यता आहे. यासंदर्भात केंद्राने राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

ओमायक्रॉनमुळे चिंता : राज्याची नियमावली आज, जाणून घ्या काय असतील निर्बंध
रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर गुरुवारी टास्क फोर्स (Task Force) सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मार्गदर्शन केलं.

या बैठकीत टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्यात नव्या निर्बंधावर चर्चा झाली आहे. ख्रिसमस, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन अशावेळी कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीनं बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. याबाबत 24 डिसेंबर रोजी नवी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.

ओमायक्रॉनमुळे चिंता : राज्याची नियमावली आज, जाणून घ्या काय असतील निर्बंध
कॅटरिनाने शेअर केला मेहंदीचा फोटो, चाहते शोधताय विकीचे नाव

काय आहे केंद्राच्या सूचना

१) सण व उत्सवामुळे रात्रीची संचारबंदी, जमावबंदी लागू करण्याची सूचना केंद्र शासनाने केली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यावर कंटेनमेंट व बफर जोन करण्यात यावे.

२) टेस्टिंग व सर्वेलांसवर विशेष लक्ष द्यावे. ICMR व आरोग्य विभागाच्या गाइडलाइननुसार टेस्ट करण्यात यावे. डोर-टू-डोर केस सर्च करावे. आरटीपीसीआर टेस्टची संख्या वाढवावी.

३) रुग्णालयात बेड, रुग्णवाहिका व आरोग्याची उपकरण वाढवावे. ऑक्सीजनचा बफर स्टॉक, ३० दिवसांची औषधे करावी.

४) अफवा पसरू नये, यासाठी सातत्याने माहिती द्यावी. रोज प्रेस ब्रीफिंग करावे.

५) राज्यांनी 100% लसीकरणावर फोकस करावे. सर्व जेष्ठांना दोन डोस देण्याचे नियोजन करावे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com