ओमियक्रॉनच्या धोक्यानंतर निर्बंधाबाबत राजेश टोपे म्हणाले...

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे

ओमियक्रॉनच्या (omicron variant)रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. ओमायक्रोनची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार अलर्ट झाले असले तरी लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण असू शकतं. यासंदर्भात परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी दिली.

ओमायक्रोनची (omicron variant)वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार अलर्ट झाले असले तरी लगेच निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक आणि कठीण असू शकतं. केंद्र शासनाचे मार्गदर्शन आणि टास्क फोर्सचे मार्गदर्शन, मुख्यमंत्र्यांचे मत या सगळ्याच्या अनुषंगाने पुढील गोष्टी ठरवू. यासंदर्भात परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी दिली आहे. परदेशातून आलेल्या १०० टक्के प्रवाशांचे स्क्रिनिंग केलं जात आहे. राज्यात जनुकीय तपासणी अर्थात जीनोमिक सिक्वेन्स तपासल्या जाणाऱ्या लॅब वाढवणार असून नागपूर आणि औरंगाबाद मध्ये नवीन लॅबची निर्मिती करण्यात येणार आहेत.

देशातील संख्या २१ वर

केवळ चार दिवसांमध्ये देशातील ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. २ डिसेंबर रोजी देशात ओमायक्रॉनची बाधा झालेला पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हापासून ६ डिसेंबरपर्यंत या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ पर्यंत पोहोचली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com