Wednesday, May 8, 2024
Homeदेश विदेशभारतात कसा आला ओमियक्रॉन? किती आहे घातक?

भारतात कसा आला ओमियक्रॉन? किती आहे घातक?

ओमियक्रॉन (Omicron Variant) हा करोनाचा नवा व्हेरीएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरीएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा करोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली आहे. (Omicron Variant in India)

Video कौन बनेगा करोडपती : अमिताभच्या डोळ्यात यामुळे आले आश्रू…

- Advertisement -

करोनाचा ओमियक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा पाचपट अधिक घातक आहे आणि याचा फैलाव आधीच्या व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने होतो’, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

आफ्रिकेतून कर्नाटकात

कर्नाटकने आज देशाला हादरविणारी बातमी दिली. काही दिवसांपूर्वीच हे रुग्ण दक्षिण आफ्रिकेहून विमानाने बंगळुरुमध्ये दाखल झाले होते. यांची तपासणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. यानंतर आरोग्य विभागाने ओमायक्रॉन व्हेरिअंटची बाधा झालीय का हे पाहण्यासाठी त्यांचे स्वॅब तपासणीला पाठविले होते. गुरुवारी त्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के सुधाकर यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच हे रुग्ण बंगळुरूमध्ये आले होते. त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत.

आतापर्यंत 29 देशात ओमियक्रॉन

29 देशांमध्ये आतापर्यंत 373 कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हायरसने लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. याची लक्षणे आतापर्यंत सापडलेल्या कोरोना व्हेरिअंटपेक्षा वेगळी आहेत. हा व्हेरिअंट वेगाने पसरत असला तरी तो डेल्टाएवढा खतरनाक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या