Video : नाशकात होणार ओमायक्रोनची चाचणी; 'कीट'बद्दल जाणून घ्या

Video : नाशकात होणार ओमायक्रोनची चाचणी; 'कीट'बद्दल जाणून घ्या

नाशिक | प्रतिनिधी Nashik

देशासह महाराष्ट्रावर आता ओमायक्रोनचे सावट (Omicron) आहे. रुग्णसंख्या वाढत असताना आता नाशिक महापालिकेनेही (Nashik Municipal corporation) कंबर कसली आहे. आता नाशिकमध्ये ओमायक्रोनची चाचणी होऊ शकेल अशी व्यवस्थाच करण्यात येत असल्याची माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव (Municipal commissioner kailas jadhav) यांनी दिली....

ओमायक्रोनची चाचणी पुण्यात होत असल्यामुळे रिझल्ट यायला उशीर होत आहे. आठवडाभराच्या विलंबाने रुग्णाला ओमायक्रोनची लागण झालीय की नाही हे निष्पन्न होत असल्यामुळे प्रशासनासह सर्वांचाच जीव यामुळे टांगणीला लागून असतो. अशा परिस्थितीत सुपरप्रेडरकडून संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.

Video : नाशकात होणार ओमायक्रोनची चाचणी; 'कीट'बद्दल जाणून घ्या
नाशकात आता 'नो व्हॅक्सिन नो एन्ट्री'

यामुळे नाशकातच ही चाचणी केली जाईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आरटीपीसार चाचणीसाठी लागणारे साहित्य खरेदी केले जाणार आहे.

यामध्ये दोन प्रकारचे किट असतात. यातील तीन जीनचे किट ६० ते ७० रुपयाला मिळतात तर चार जीनचे तपासणी किट २५० रुपयांपर्यंत मिळतात.

Video : नाशकात होणार ओमायक्रोनची चाचणी; 'कीट'बद्दल जाणून घ्या
खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी एकवटले; व्यवहार ठप्प

शहर आणि ग्रामीणमध्ये १० हजार किट खरेदी केले जाणार असल्याचे यावेळी जाधव यांनी सांगितले. संशयित रुग्ण आणि परदेशी नागरिक, त्यांच्या संपर्कातील नागरिक यांची तपासणी चार जीनच्या किट द्वारे होणार आहे. तर बाहेरून आलेल्या नागरिकांची प्रथम तपासणी करण्यात येणार असून त्याचबरोबर त्यांच्या संपर्कातील नागरिकांचे चाचणी ही एस जीनंद्वारे करणार असल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी दिली.

Related Stories

No stories found.