विमान प्रवासाबाबत राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

ओमायक्राॅॅन Omiocron या नव्या उत्परीवर्तीत विषाणूला रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. दक्षिण अफ्रिकेसह South Africa बोस्वानाBoswana आणि झिम्बाब्वे Zimbabwe हे तीन देश अतिसंवेदशनशील देशम्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या देशातून महाराष्ट्रात Maharashtra येणा-या प्रवाशांची विमानतळावरच आरटीपीसीआर चाचणी RTPCR Test केली जाईल. ही चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्या प्रवाशाची रवानगी थेट कोविड केअर सेंटरमध्ये Covid Care Center होणार आहे.

दक्षिण अफ्रिकेसह जगातील बारा देशांमध्ये ओमायक्रोनचे विषाणू सापडल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या नियमावलीत बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने नवीन नियमावली जाहीर केली असून दक्षिण अफ्रिका, बोस्वाना आणि झिम्बाब्वे हे तीन देश अतिसंवेदनशील देश म्हणून घोषित केले आहेत.

परदेशातून खास करून गेल्या पंधरा दिवसापूर्वी या तीन देशातून महाराष्ट्रात येणा-या प्रवाशांच्या संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन निमयावली

* अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केलेल्या देशातून आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणा-या प्रवाशांना प्राधान्याने तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष सुरु करावेत

* या प्रवाशांची विमानतळावरच तातडीने आरटीपीसीआर चाचणी होईल. त्यानंतर सात दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल.

* आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित प्रवाशांची रवानगी विमानतळावरूनच थेट कोविड उपचारांची सुविधा असलेल्या रुग्णालयात होईल

* पुन्हा सात दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी होईल. त्यात चाचणी निगेटिव्ह आली तरीही पुढील सात दिवस होम क्वारंटाईन रहावे लागेल

* या प्रवाशांनी मागील पंधऱा दिवसात कोणत्या देशातून प्रवास केला आहे त्याची माहिती एका फॉर्मवर नोंदवून घेतली जाईल. चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास कारवाई होईल

* देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. अशा प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. अन्यथा ७२ तास आधीचा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *