Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedदेशात ओमायक्रॉन बाधितांची संख्या 45 वर, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

देशात ओमायक्रॉन बाधितांची संख्या 45 वर, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

देशात ओमायक्रॉनमुळे (Omicron) चिंतेत भर पडली आहे. देशातील ओमायक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या 45 झाली आहे. महाराष्ट्रातील (maharashtra)ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 20 झाली आहे. दिल्लीत (new delhi)ही सहा रुग्ण झाले आहेत.

Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

- Advertisement -

देशात ओमायक्रॉनचे 45 रुग्ण

दिल्लीत चार ओमायक्रॉन बाधित आढळल्यानंतर आता देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. सोमवारी महाराष्ट्रात आणखी दोन जणांना कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे आढळून आले. दोघेही दुबईला गेले होते. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेतून गुजरातला परतलेल्या एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले.

राज्यातील संख्या 20 वर

महाराष्ट्रात लातूरमध्ये एक आणि पुण्यात ओमायक्रॉनचा आणखी एक रुग्ण आढळून आल्याचे सांगितले होते. पुण्यात सापडलेला रुग्ण 39 वर्षीय महिला आहे, तर लातूरमधील संक्रमित 33 वर्षीय पुरुष आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 20 झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या