Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकेंद्रीय समितीचा दावा : देशात ओमायक्रॉनच्या सामुहिक प्रसाराला सुरुवात

केंद्रीय समितीचा दावा : देशात ओमायक्रॉनच्या सामुहिक प्रसाराला सुरुवात

देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Omicron)गेल्या महिना भरापासून झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. आता दिवसाला सव्वातीन लाखांवर कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. त्यात महाराष्ट्रात रोज ४० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. आता केंद्राची कोरोनावर लक्ष ठेवणारी समिती इन्साकॉगने ओमायक्रॉनने (Omicron)सामुहिक प्रसाराला (community transmission)सुरुवात केल्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेले टेलिप्रॉम्प्टर आहे काय?

- Advertisement -

ओमायक्रॉनपासून (Omicron)निर्माण झालेला दुसरा कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतात सापडल्याचा दावा ब्रिटनने केला आहे. याचबरोबर युरोपमध्ये या नव्या व्हेरिअंटचा प्रसार वेगाने होत असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर इन्साकॉ़गचा (INSACOG)इशारा आला आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे.

Photo : चंगा लगदा मेनू…म्हणत सई ताम्हणकरने शेअर केले साडीतील हटके फोटो

इन्साकॉ़ग काय आहे?

NSACOG ची स्थापना 25 डिसेंबर 2020 रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत करण्यात आली. ही समिती भारतातील कोविड-19 आणि विषाणूच्या प्रकारांच्या जीनोम अनुक्रमांचा अभ्यास आणि निरीक्षण करते.

- Advertisment -

ताज्या बातम्या