Yuvarang Youth Festival # महाराष्टाची हास्य जत्रा फेम ओकांर भोजनेंने फैजपूरात दिला तरूणाईला हा सल्ला...

Yuvarang Youth Festival # महाराष्टाची हास्य जत्रा फेम ओकांर भोजनेंने फैजपूरात दिला तरूणाईला हा सल्ला...

फैजपूर Faizpur (प्रतिनिधी)

सध्याची परिस्थिती आव्हानाची (challenge) आहे. यात संधी (chance) शोधता आली पाहिजे. आपण काय करू शकतो, आपल्या जवळ कोणती शैली आहे हे ओळखता यायला हवे. उद्या काय मिळणार या चिंतेत आपण आज जे मिळवायचे ते राहून जाते. तसे करू नका. आपली स्पर्धा इतरांपेक्षा स्वतःशी जास्त आहे त्यामुळे गाभिर्याने बघा असे आवाहन करताना गर्दीत आपला पाय इतरांवर आणि इतरांचा आपल्या पायावर  पडणार नाही याची काळजी घ्या . असा मैत्रीचा सल्ला (advice) महाराष्टाची हास्य जत्रा फेम (Maharashtra Laughter Fair fame) नाट्य- सिने कलावंत (Theater-cinema artist) ओंकार भोजने (Okanar Bhojan) यांनी दिला.

फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित युवारंग युवक महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी होते.  यावेळी तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे अध्यक्ष तथा महोत्सवाचे स्वागताध्यक्ष  आमदार शिरीषदादा चौधरी, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, डॉ. संतोष चव्हाण, केसीईचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, व्यवस्थापन परिषद सदस्य तथा युवारंग युवक महोत्सवाचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, संचालक, विद्यार्थी विकास प्रा.सुनील कुलकर्णी, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, प्राचार्य पी. आर. चौधरी, माजी प्राचार्य व्ही. आर. पाटील, अधिसभा सदस्य प्राचार्य शिवाजी पाटील, प्राचार्य के.बी.पाटील, प्राचार्य सुनील पवार,प्रा. अनिल पाटील, प्रा. सुरेखा पालवे, प्रा.पद्माकर पाटील, प्रा.संदीप नेरकर, प्रा. पी.डी. पाटील, प्रा. दिनेश चव्हाण , अमोल पाटील, स्वप्नाली महाजन, नितीन झाल्टे, नेहा जोशी, याशिवाय नरेंद्र नारखेडे तसेच तापी परिसर विद्या मंडळाचे पदाधिकारी लिलाधर चौधरी, डॉ. एस. के. चौधरी, एम.टी. फिरके, एन.ए. भंगाळे, के. आर. चौधरी, मिलिंद वाघुळदे, संजय चौधरी, डॉ. एस. एस. पाटील, डॉ. नितीन महाजन, एस. व्ही. जाधव, धनंजय चौधरी आदी उपस्थित होते.

शुक्रवारी या महोत्सवाचं सुनितभाई बोंडे रंगमंचावर जल्लोषात उद्घाटन झाले. ओंकार भोजने यावेळी म्हणाले की, मी देखील युवक महोत्सवातून घडला आहे. सामाजिक जाणीव यातून निर्माण होते. सध्याची परिस्थिती आव्हानाची आहे. यात संधी शोधता आली पाहिजे. आपण काय करू शकतो, आपल्या जवळ कोणती शैली आहे हे ओळखता यायला हवे. उद्या काय मिळणार या चिंतेत आपण आज जे मिळवायचे ते राहून जाते. तसे करू नका. आपली स्पर्धा इतरांपेक्षा स्वतःशी जास्त आहे त्यामुळे गाभिर्याने बघा असे आवाहन करताना गर्दीत आपला पाय इतरांवर आणि इतरांचा आपल्या पायावर  पडणार नाही याची काळजी घ्या . असा मैत्रीचा सल्ला भोजने यांनी दिला. यावेळी ओंकार भोजने यांनी "तुझी तुलाच पुरी करायची हौस" आता हे आगामी चित्रपटातील गीत सादर केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवी वर्षात फैजपूर या ऐतिहासिक गावात हा महोत्सव होतोय याचा आनंद आहे. महोत्सवातून नेतृत्व, एकता, मैत्रीभाव वाढतो. निरीक्षण शक्ती वाढते. नवी पिढी तंत्रज्ञानाचा आधार घेत सर्जनशीलतेने व्यक्त होते आहे. बहिणाबाई यांचा वारसा हे कलावंत पुढे नेताय, कले सोबत शिक्षणाकडेही गांभिर्याने बघा. शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे. ही पिढी काहीशी गोंधळलेली आहे. अभिमान ही सर्जनता घडवते तर अहंकार हा विध्वंस घडवतो. दयाभाव, माणुसकी, करूणा आपल्या व्यक्तीमत्वात येवू द्या असे आवाहन कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी केले.

युवारंग महोत्सवाचे स्वागताध्यक्ष शिरीषदादा चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यापीठाच्या तरूणाईचे दर्शन आम्हाला घडते आहे कारण देशाचे भवितव्य असलेला तरूणाई व त्यांच्या कला गुणांची उधळण येथे होते आहे. इतिहासाचा पोवाडा बोलूण चालणार नाही तर तो समजला गेला पाहिजे, इथला सहवास हा मुक्त आहे. आपल्या कला गुणांचं प्रदर्शन करणार आहात,जीवनातली सर्व चिंता, त्रास विसरूण मुक्तपणे जगा मात्र सामाजिक जाणीव विसरू नका, आपले वागणं, चालणं, बोलणं यातून माणूस कळतो. जीवनात हे क्षण क्वचित येतात सहभागातून आनंद घ्या असा मौलिक सल्ला यावेळी आ.शिरीष चौधरी यांनी दिला.

युवारंग युवक महोत्सवाची पार्श्वभूमी मांडताना प्रा. सुनील कुलकर्णी म्हणाले की, जग विश्वासावर चालते तेव्हा विश्वास सार्थ करा, स्पर्धेत संघर्ष आहे, संघर्षाचा विजय नेहमी होतो. विपरित परिस्थितीत विद्यार्थ्यांना  त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मंच उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा मानस नेहमी असतो.

युवक महोत्सवाचे कार्याध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यावेळी म्हणाले की, खान्देशात अनेक कर्तृत्ववान माणसे आहेत . यात कवयित्री बहिणाबाई चौधरी, भालचंद्र नेमाडे, साने गुरूजी आहेत. त्यांनी खान्देशाला मानाचे स्थान निर्माण करून दिले आहे. या पवित्र  भूमित आपला सहवास हा जीवनातील अमुल्य ठेवा म्हणून स्मरणात ठेवा असे आवाहन यावेळी राजेंद्र नन्नवरे यांनी केले.

सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी हा परिसर ऐतिहासिक आहे. या परिसराला जागतिक वारसा आहे तो. वारसा सर्व विद्यार्थ्यांनी  मनात रुजवावा, हा युवारंग नसुन मुक्तांगण आहे या मुक्तांगणाचा आस्वाद घ्या व त्याप्रमाणे जीवन अंगिकारा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रारंभी कुलसचिव. विनोद पाटील यांनी कलावंताना शपथ दिली. त्या आधी कुलगुरू व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिले अधिवेशन फैजपूर येथे झाले होते त्या अधिवेशनाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू यांच्या हस्ते झाले. युवक महोत्सव आयोजनामागची भूमिका प्राचार्य पी.आर.चौधरी यांनी मांडली, उद्घाटन कार्यक्रमातचे आभार  महोत्सवाचे समन्वयक प्रा. एस व्ही जाधव यांनी मानले, सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र राजपूत डॉ.राजश्री नेमाडे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com