Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट पण पेट्रोल, डिझेल ‘ जैसे थे...

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट पण पेट्रोल, डिझेल ‘ जैसे थे ’

नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर घसरल्या आहेत. मात्र, देशांतर्गत तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केलेला नाही. यापूर्वी सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले होते.

- Advertisement -

शुक्रवारी नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत ९७.५१ रुपये आहे. यापुर्वी २३ व २४ मार्च रोजी किमत अनुक्रम १८ व २० पैसे कमी झाली होती.युरोपात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. गेल्या सत्रात बेंचमार्क कच्च्या तेलाच्या किंमती ४.३ टक्क्यांनी घसरल्या होत्या. ब्रेंट क्रूड २.७९ डॉलरच्या घसरणीसह ६१६२ डॉलर प्रती बॅरलवर आले होते. यूएस वेस्ट टॅक्सस इंटरमीडियएटची किंमतही ५.२ टक्क्यांनी घसरून ५७.९८ डॉलर प्रती बॅरलवर आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या