महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई यांची मंत्रालयात तैलचित्रे

महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई यांची मंत्रालयात तैलचित्रे

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

सामाजिक संदेश देणारे थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले ( Mahatma Jotirao Phule)आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले ( Savitribai Phule ) यांची तैलचित्रे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात येणार आहेत. त्यानुसार आज सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shine ) यांच्या हस्ते व आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत या तैलचित्रांचे अनावरण करण्यात येणार आहे.

मंत्रालयाच्या इमारतीत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची तैलचित्रे लावण्याची मागणी छगन भुजबळ यांनी लावून धरली होती. त्यासाठी त्यांचा सतत पाठपुरावाही सुरु होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची दशसूत्री लावली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com