रस्त्यांच्या प्रश्नावरुन अधिकार्‍यांची खरडपट्टी

मनपा महासभा: प्रशासनाच्या कामांवर सर्व सदस्यांची नाराजी
रस्त्यांच्या प्रश्नावरुन अधिकार्‍यांची खरडपट्टी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

इतर शहरातील अमृत योजनांचे (Amrit Yojana) कामे संपण्यात (finishing works) आले. पण, आपल्या जळगाव शहरातील अमृत योजनेच्या जलवाहिनींचे (Aqueduct Works) कामे पुर्ण होत नाही. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते खड्डेमय (roads are potholed) झाले असून नागरिक (citizens) आम्हाला खराब (Swearing) रस्त्यांवरून शिव्या घालत आहे. मनपा प्रशासनातील आधिकारी (Officials in municipal administration) एकमेंकाकडे बोट दाखवून चालढकल (behavior) करतात त्यामुळे संपूर्ण शहराचे वाटोळे (City streets) केले आहे. नगरसेवक प्रभागातील तक्रारी (Complaints) करून सुध्दा अधिकारी ते ऐकत नसल्याचे सर्व सदस्यांनी आरोप करीत मनपा अधिकार्‍यांची (officer) चांगलीच झाडाझडती मनपा महासभेत (Municipal Assembly) घेतली.

जळगाव शहर महानगर पालिकेची महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या उपस्थितीत झाली. व्यासपिठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते.

महासभेच्या सुरवातीलाच रस्ते दुरुस्तीच्या विषयांवरून शिवसेना, भाजप सदस्यांनी अमृत योजनेच्या विलंबामूळे रस्त्यांचे कामे होत नाही, तसेच ज्या रस्त्यांचे कामे सुरू झाली ते अपूर्ण असून ते केव्हा सुरू होईल. अर्पाटमेंटमध्ये तसेच नागरिकांना नळ कनेक्शन देण्याच्या विलंबावरून देखील सर्व सदस्यांनी मनपा प्रशासनाच्या अधिकार्‍यांची चांगलीच खरडपट्टी काढत आयुक्तांना थेट विनंती करत कामचुकार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी सभागृहात केली.

तसेच यावेळी भाजप सदस्या दिपमाला काळे, ज्योती चव्हाण, अ‍ॅड. दिलीप पोकळे, विशाल त्रिपाठी आदी सदस्यांनी अधिकार्‍यांच्या कारभाराव नाराजी व्यक्त केली. यावेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी अमृत योजनेच्या तांत्रिक अडचणीची माहिती तसेच काही अडचणी सोडविल्या असून कामे त्वरीत सुरू करण्यात आले असल्याची माहिती सभागृहाला दिली.

निधी असूनही तो का खर्च होत नाही

महापालिकेत अनेक कामांसाठी तसेच रस्त्यांच्या कामांसाठी निधी आहे. परंतू मंजूर रस्तांचेे कामे अजून होत नाही, हा निधी पून्हा परत जाण्याच्या मार्गावर असून यासाठी योग्य समन्वयाची गरज असल्याचे ा सांगितले. तसेच 100 कोटी निधी केवळ कागदावर होता त्यापैकी 42 कोटीचे कामांना मंजूरी मिळाली. पण त्यापैकी किती कामे अजून ही पूर्ण झाली याचे रेकॉड नाही. तसेच घनकचरा प्रकल्पाचे देखील तसेच झाले असून निधी पडून असून देखील हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. यात मनपाचे प्रशासनाचे नियोजन नसल्याचे दिसून येते. तर भाजपचे सदस्य विशाल त्रिपाठी म्हणाले, की पुर्वी मनपा प्रशासनाने एक स्वंतत्र अधिकार्‍याची नेमणूक केली होती राज्य सासनाकडून निधी आणण्यासाठी व त्याचा पाठपुराव करण्याचा. परंतू आता काहीच नियोजन नसल्याचे खंत व्यक्त केली.

महापौर, उपहापौरांनी राजीनामा द्यावा

भाजप सदस्य कैलास सोनवणे यांनी यावेळी बोलतांना म्हणाले, की कोरोना काळात प्रशासनातील एक ही डॉक्टर, नर्स आदी कर्मचारी सुट्टीवर न जाता त्यांच्याकडून भाजपच्या महापौरांनी समन्वय ठेवून काम केले. परंतू शहरातील रस्त्यांची परिस्थीती पाहता तसेच प्रशासनातील अधिकारी नगरसेवकांचे एैकत नसतील तर पदाधिकांर्‍याची प्रशासनावर पकड नसल्याचे दिसून येत असून महापौर व उपमहापौर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावेळी शिवसेना व भाजप सदस्यांमध्ये एकच गोधंळ होवून शाब्दीक बोलचाल झाली. यावेळी शिवसेना सदस्यांनी भाजप सदस्य विषयांतर करत असल्याचा आरोप यावेळी केला.

घरकुलधारकांना नळ कनेक्शनवरून संभ्रम

महासभेच्या विषयत्रिकेवरील घरकुल धारकांना अमृत योजना अंर्तगत नळ कनेक्शन देण्यावरून मनपा प्रशासन व भाजप शिवसेना सदस्यांमध्ये संभ्रम दिसून आला. यावेळी एक तास चर्चा होवून यावर यावेळी घरकुलांचा हस्तांतरण, नळ कनेक्शन आकारणी यावर सर्व पक्षीय गटनेते अधिकारी यांची बैठक घेवून पुढील महासभेत प्रस्ताव मांडला जाणार आहे.

भूसंपादनासाठी राज्य शासनाकडे निधी मागा

जळगाव शहरातील विविध ठिकाणांवरील भूसंपादन करण्यासाठी निधी महापालिकेडे निधी कमी आहे. त्यामुळे सर्व विषय एकत्रित करून राज्यशासनाकडून यासाठी निधी प्राप्त व्हावा यासाठी जिल्ह्याला लाभलेल्या दोन मंत्र्याकडे मागणी करावी अशी मागणी यावेळी सभागृभूसंपादनासाठी राज्य शासनाकडे निधी मागा

जळगाव शहरातील विविध ठिकाणांवरील भूसंपादन करण्यासाठी निधी महापालिकेडे निधी कमी आहे. त्यामुळे सर्व विषय एकत्रित करून राज्यशासनाकडून यासाठी निधी प्राप्त व्हावा यासाठी जिल्ह्याला लाभलेल्या दोन मंत्र्याकडे मागणी करावी अशी मागणी यावेळी सभागृहात लढ्ढा यांनी केली.

काम पूर्ण होवून बिले निघत नाही

शहरातील अनेक प्रभागात विविध विकास कामे विविध निधीतून पूर्ण झाली असून त्यांच्या बिलांची फाईल अधिकार्‍यांच्या टेबलावर दोन-दोन महिने पडून आहे. हा निधी पून्हा परत जाण्याच्या मार्गावर आहे. बिलांच्या फाईलींची का अडवणूक होते काही हेतू असतो असा गंभिर आरोप यावेळी शिवसेना सदस्य बंटी जोशी यांनी केले.

एनओसी दिल्यावर पुन्हा रस्ते का खोदले जातात

शहरातील विविध रस्त्यांचे कामे सुरू केली आहे परंतू प्रशासनाकडून एनओसी दिल्यावर सुध्दा देखील रस्ते पून्हा का खोदले जातात. यावर अधिकार्‍यांचे लक्ष नसते का? केवळ तोंडी सुचना दिल्या जातात असे आरोप शिवसेना सदस्य नितीन बरडे यांनी करून अधिकार्यांना चांगलेच सुनावले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com