Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याPolice Officers Transfer : राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल 'इतक्या' अधिकाऱ्यांच्या बदल्या

Police Officers Transfer : राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई | Mumbai

राज्याच्या पोलिस खात्यात (Maharashtra Police Department) पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली असून एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे (Dhule District) पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती झाली. बारकुंड यांनी यापूर्वी तीन वर्ष नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे विभागाची जबाबदारी सांभाळलेली होती.

- Advertisement -

Chhagan Bhujbal : “तुम्ही एका समाजाची…”; मंत्रीपदावरून हकालपट्टीची मागणी करणाऱ्या संभाजीराजेंना भुजबळांचे प्रत्युत्तर

तसेच नाशिक ग्रामीणच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे-केदार यांची अतिरिक्त अधीक्षक लोहमार्ग पुणे येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर आदित्य धनंजय मिरखेलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कांगणे यांनी नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलात सात ते आठ वर्ष सेवा बजावली आहे. तर गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण संस्था नाशिकचे प्राचार्य अशोक नखाते यांची जळगाव येथे अप्पर अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Manoj Jarange patil : “छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून…”; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

दरम्यान, याशिवाय जालन्यातील (Jalna) अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केल्यानंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले तुषार दोषी यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांची थेट गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला प्रश्न देखील विचारला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

“आमच्या वाट्याला याल तर याद राखा”; ओबीसींच्या महाएल्गार सभेतून भुजबळांचा घणाघात

बदली झालेले अधिकारी खालीलप्रमाणे

विशाल सिंगुरी, पोलिस अधीक्षक- नक्षल विरोधी अभियान (पोलिस अधीक्षक- अमरावती ग्रामीण).

तुषार दोषी (जालना- पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

संजय बारकुंड, पोलिस अधीक्षक धुळे (पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक).

श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक लोहमार्ग पुणे (पोलिस अधीक्षक धुळे).

प्रीतम यावलकर, पोलिस अधीक्षक, सायबर मुंबई (अतिरिक्त अधीक्षक, सोलापूर ग्रामीण).

कविता नेरकर, अतिरिक्त अधीक्षक अंबाजोगाई (पोलिस अधीक्षक सायबर मुंबई)

दिनेश बारी, पोलिस अधीक्षक सीआयडी (पोलिस अधीक्षक फोर्स वन मुंबई).

श्रीनिवास घाडगे (पुणे शहर- नागरी हक्क संरक्षण, नागपूर),

गणेश शिंदे, अतिरिक्त अधीक्षक लोहमार्ग पुणे (पोलिस उपायुक्त अमरावती).

अनुज तारे, अतिरिक्त अधीक्षक गडचिरोली (पोलिस अधीक्षक वाशीम).

नवनीत कुमार कॉवत, अतिरिक्त अधीक्षक धाराशिव (पोलिस उपायुक्त छत्रपती संभाजीनगर).

मोक्षदा पाटील, पोलिस अधीक्षक लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल-८ मुंबई).

अशोक बनकर, अतिरिक्त अधीक्षक गोंदिया (प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना).

माधुरी केदार, अतिरिक्त अधीक्षक नाशिक ग्रामीण (अतिरिक्त अधीक्षक लोहमार्ग पुणे).

चंद्रकांत गवळी, अतिरिक्त अधीक्षक जळगाव (प्राचार्य गुप्तचर प्रशिक्षण शाळा, नाशिक).

हिमत जाधव, अतिरिक्त अधीक्षक सोलापूर ग्रामीण (पोलिस उपायुक्त मुंबई).

शशिकांत सातव अतिरिक्त अधीक्षक अमरावती (पोलिस उपायुक्त नागपूर).

अशोक नखाते, प्राचार्य (अतिरिक्त अधीक्षक जळगाव).

विक्रम साळी, पोलिस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण नाशिक (अतिरिक्त अधीक्षक अमरावती ग्रामीण) .

- Advertisment -

ताज्या बातम्या