Tuesday, May 14, 2024
Homeमुख्य बातम्याहरकतींचा अहवाल निवडणूक आयोगाकडे

हरकतींचा अहवाल निवडणूक आयोगाकडे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी ( NMC Upcoming Elections ) महापालिका प्रशासनाने शहरातील 44 प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना ( Ward Structure ) जाहीर करून त्याच्यावर हरकती मागवल्या होत्या तर राज्य निवडणूक आयोगाच्या ( State Election Commission ) प्राधिकृत अधिकारी असलेल्या तसेच सिडकोचे सहसंचालक अश्विनकुमार मुदगल यांनी 23 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतली होती. त्याचा सविस्तर अहवाल काल निवडणूक आयोगाकडे रवाना झाला.

- Advertisement -

मुदगल यांच्या मार्फतच अहवाल जाणार होता,त्यामुळे महापालिकेच्या वतीने त्यांना सर्व प्रकारच्या कागदपत्रांंची पूर्तता करून देण्यात आली होती. आयोगाने दोन तारखेची मुदत पाच तारखेपर्यंत वाढली होती, त्यामुळे काल याबाबतचा अहवाल आयोगाकडे गेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान 15 मार्चपर्यंत अंतिम अहवाल जाहीर होणार असल्याचे समजते. यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.

15 मार्चपासून नाशिक महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून महापालिकेचे आयुक्त कैलास जाधवच हाकणार आहे. याबाबतचे या आदेश राज्याचे नगरविकास विभागाच्या वतीने नुकतेच देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अहवाल आज रवाना झाल्याने नेमका आयोग त्याच्यावर काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या