नाशिक महापालिकेत 'इतक्या' जागा ओबीसींसाठी राखीव

नाशिक महापालिकेत 'इतक्या' जागा ओबीसींसाठी राखीव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिका निवडणुकीसाठी (NMC Election) ओबीसी आरक्षणाची साेडत (OBC Reservation Luck Draw) २९ जुलै रोजी काढण्यात येणार आहे...

२७ टक्के ओबीसी आरक्षण (OBC Reservation) राहणार असल्यामुळे १३३ मधून २७ टक्के म्हणजे ३५.९१ टक्के होतात, मात्र पूर्णांक न घेता जागा सोडण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्यामुळे ३५ जागा ओबीसीसाठी राखीव करण्यात येणार आहे.

शालिमार येथील महापालिकेच्या कवी कालिदास कला मंदिरामध्ये सकाळी अकरा वाजता महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत निघणार आहे, अशी माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील (Manoj Ghode-Patil) यांनी दिली.

खुल्या १०४ जागापैकी ओबीसींच्या काेट्यात ३५ जागा येणार आहे. त्यात पुरूषांसाठी १७ जागा तर १८ जागा महिलांसाठी आरक्षित हाेणार असल्याने महिला आघाडीवर आहेत.

एकूण 133 जागापैकी पुरूष ६६ तर महिलांसाठी ६७ जागा अारक्षित हाेत असल्याने या निवडणुकीत महिलांनीच आघाडी घेतली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com