मविआमुळे ओबीसी आरक्षणाला विलंब; माजीमंत्री बावनकुळे यांचा आरोप

मविआमुळे ओबीसी आरक्षणाला विलंब; माजीमंत्री बावनकुळे यांचा आरोप

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नाकर्तेपणामुळे गेली अडीच वर्षे ओेबीसी समाजाला (OBC Community) आरक्षणापासून (reservation) मुकावे लागले. त्यांंनी केवळ टाईमपासच केला. मी त्याचा साक्षीदार आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व अजित पवार (Ajit Pawar) हे दोघे झारीतील शुक्राचार्य होते. त्यामुळे ओबीसी जनसंख्या मोजणीेसाठी 435 कोटी रुपये मिळू शकले नाही, असा आरोप आज ओबीसी नेते माजी मंंत्री चंद्रशेखर बावनकुळे (OBC Leader Former Minister Chandrasekhar Bawankule) यांनी आज येथे केला.

राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या कार्यकाळात रखडलेले ओबीसी आरक्षण (OBC reservation) नव्याने गठीत झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या चातुर्यामुळे कायदेशीर मार्गाने राज्यातील ओबीसी समाजाला बहाल करण्यात आले.

यात महाविकास आघाडी सरकार पुरते कसे अपयशी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले परिश्रम हे यशस्वी झाल्याने त्याबबत आयोजित कार्यक्रमासाठी बावनकुळे आज नाशिक दौर्‍यावर (tour of Nashik) आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ. सीमा हिरे, देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, विजय साने, बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सुनील केदार, सुनील आडके, पवन भगुरकर,संतोष नेरे आदींंसह पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी या आरक्षण लढ्यांचा प्रवास यावेळी विषद केला. ते म्हणाले, 15 ऑगस्टपासून 9 केंद्रीय मंत्री 18 महिने दौरे करणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील (maharashtra) सोळा लोकसभा मतदारसंघांचा (Lok Sabha constituencies) समावेश आहे. तेथे भाजपचाच झेेंंडा फडकेल, यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी ही पूर्वतयारी आहे.

आरक्षण लढ्याच्या प्रवासाबाबत ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगूनही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने तिहेरी चाचणी पूर्ण करण्यासाठी काम केले नाही म्हणून राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण (Political reservation) गमावले. अडीच वर्षे वेळ वाया घालविणार्‍या महाविकास आघाडीने आता ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीरपणे फडणवीस यांचे अभीनंदन करावे. सत्तेची सूत्रे हाती आल्यानंतर चार महिन्यांत ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा प्रस्थापित करेन, नाहीतर राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीे केली होती. त्यांनी वचन पूर्ण केले आहे.

ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीला ओबीसींना राजकीय आरक्षण (Political reservation) द्यायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही समर्पित आयोग नेमणे व एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी हालचाली केल्या नाहीत. एंपिरिकल डेटाचे काम करण्याच्या ऐवजी सातत्याने केंद्र सरकारकडे (central government) 2011 च्या जनगणनेची माहिती मागून केंद्राकडे बोट दाखवत वेळ वाया घालविला.

बांठिया आयोग नेमल्याबद्दल आघाडीचे नेते सांगत असले तरी हे काम मार्च 2022 मध्ये करण्याच्या ऐवजी आधी का केले नाही आणि एंपिरिकल डेटा (Empirical data) आधी का गोळा केला नाही याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. आता शिंदे-फडणवीस सरकारच्या पुढाकारामुळे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, अनुसूचित जाती - जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण हे प्रश्नही सुटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंना टोला

यावेळी उध्दव ठाकरे याना खा. संजय राऊत यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. आजपर्यंंत जेवढे नुकसान झाले. हसू झाले, त्याला कान भरणारे राऊत कारणीभूत असून आता तरी त्यांच्यापासून दूर राहा व हसू करुन घेणे टाळा. अऩ्यथा उरले सुरले शिवसैनिकही दूर गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा त्यांनी टोला लगावला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com