OBC Reservation : ओबीसी महासंघाचे २१ दिवसानंतर उपोषण मागे; OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही, फडणवीसांचे आश्वासन

OBC Reservation : ओबीसी महासंघाचे २१ दिवसानंतर उपोषण मागे; OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही, फडणवीसांचे आश्वासन

चंद्रपूर | Chandrapur

ओबीसी आरक्षणातून (Obc Reservation) मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी गेल्या २१ दिवसांपासून ओबीसी महासंघाचे (OBC Federation) उपोषण सुरु होते. काल सह्याद्री अतिथीगृहावर सरकारसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ओबीसी महासंघाने उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणस्थळी येऊन चंद्रपुरातील ओबीसी आंदोलक रवींद्र टोंगे, परमानंद जोगी व विजय बल्की यांना ज्यूस दिला. यानंतर टोंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सोडले...

OBC Reservation : ओबीसी महासंघाचे २१ दिवसानंतर उपोषण मागे; OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही, फडणवीसांचे आश्वासन
Dev Dya Devpan Ghya : मूर्तीदानाचे सर्व विक्रम मोडीत; तब्बल 'इतक्या' मूर्तींचे संकलन

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार ओबीसी समाजाच्या पाठी असून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावून आरक्षण दिले जाणार नाही. ओबीसींच्या कोणत्याही मुद्द्यावर सरकारची नकारात्मक भूमिका नाही. आम्ही सकारात्मक आहोत. ओबीसींना निधी देण्यात आम्ही तसूभरही मागे हटणार नाही, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले.

OBC Reservation : ओबीसी महासंघाचे २१ दिवसानंतर उपोषण मागे; OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही, फडणवीसांचे आश्वासन
सरकारी शिक्षणाचा दर्जा खालावला; आमदार सत्यजित तांबे यांची टीका

पुढे ते म्हणाले की, काल मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला आश्वस्त केले आहे की, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नाही व मराठ्यांना ओबीसी अंतर्गत कोणतेही आरक्षण दिले जाणार नाही. दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही ही राज्य सरकारची भूमिका आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या इतरही मागण्या मान्य केला आहे. ओबीसींसाठी १० लाख घरे देण्याची योजना तयार केली. राज्य सरकारला ओबीसींचे हित करायचे आहे. सर्व प्रश्न सुटले नाही, मात्र प्रयत्न असणार आहे. ओबीसींच्या योजनेसाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही. तसेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मेडिकल प्रवेशात २७ टक्के आरक्षण देऊन संविधानिक दर्जा दिला आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com