जिल्ह्यात करोनावर मात करणार्‍यांची संख्या वाढली

जिल्ह्यात करोनावर मात करणार्‍यांची संख्या वाढली

दिवसभरात 4 हजार 279 रूग्ण करोनामुक्त

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत चढउतार होत असला तरी दिवसेंदिवस करोनावर मात करणार्‍यांचा आकडा वाढत चालला आहे. मागील चोवीस तासात 4 हजार 279 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुक्त होणारांच्या संख्येने 3 लाख 4 हजार 562 चा आकडा पार केला आहे.

आज दिवसभरात 4 हजार 110 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र बरे होणार्‍या रूग्णांचा आकडा पॉझिटिव्हपेक्षा दीडशेने अधिक आहे. तसेच उपचाराखालील रूग्णसंख्येतही मोठी घट होत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे. दरम्यान मृत्युचे प्रमाण कायम असून आज 47 रूग्णांचा मृत्यू झाले. नाशिक शहरात करोना आटोक्यात येत असून ग्रामिण भागात मात्र कोरोनाचे रूग्ण संख्या अधिक आहेत. तसेच मृत्युचे प्रमाणही ग्रामिण भागात अधिक असल्याचे चित्र आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 4 हजार 110 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 1 हजार 892 रुग्ण आहेत. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या काहीसी वाढ असून आज ग्रामिण भागातील 2 हजार 87 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात 89 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 11 हजार 715 झाला आहेे. जिल्हा बाह्य 42 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 4 हजार 696 झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा आकडा 3 लाख 42 हजार 91 इतका झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये मात्र सातत्य कायम असून आज जिल्ह्यात 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील सर्वाधिक 24 रूग्ण आहेत, नाशिक शहरातील 17, मालेगाव येथील 6 रूग्णांचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 3 हजार 692 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही घटत चालला असून मागील चोवीस तासात 3 हजार 620 नवे संशयित दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक 3 हजार 341 नाशिक शहरातील आहेत. तर आज दिवसभरात 33 हजार 837 रूग्णांवर उपचार सुरू होते.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 3,42,091

* नाशिक : 2,02,045

* मालेगाव : 11,715

* उर्वरित जिल्हा : 1,23,635

* जिल्हा बाह्य ः 4,696

* एकूण मृत्यू: 3,692

* करोना मुक्त : 3,04,562

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com