जिल्ह्यात करोनावर मात करणार्‍यांची संख्या वाढली

24 तासात 5 हजार 206 जण करोना मुक्त; 3 हजार 749 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; 40 मृत्यू
जिल्ह्यात करोनावर मात करणार्‍यांची संख्या वाढली
करोना

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात एकीकडे करोनाचा उद्रेक सुरूच असताना दुसरीकडे मात्र करोनावर मात करणार्‍यांचा आकडा वाढत चालल्याने दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात 3 हजार 749 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र बरे होणार्‍या रूग्णांचा आकडा पॉझिटिव्हपेक्षा 2 हजाराने अधिक आहे. एकुण 5 हजार 206 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान आज 40 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक शहराबरोबरच ग्रामिण भागात करोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. तसेच मृत्युचे प्रमाणही ग्रामिण भागात अधिक असल्याचे चित्र आहे. मागील चोवीस तासात 5 हजार 206 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 2 लाख 79 हजार 621 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 3 हजार 749 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 1 हजार 820 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 92 हजार 741 वर पोहचला आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 1 हजार 821 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 1 लाख 15 हजार 356 झाला आहे. मालेगावात 84 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 11 हजार 433 झाला आहेे. जिल्हा बाह्य 24 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 4 हजार 404 झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा आकडा 3 लाख 23 हजार 934 इतका झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यू संख्येमध्ये दररोज मोठी वाढ होत असून आज जिल्ह्यात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील सर्वाधिक 24 रूग्ण आहेत, ग्रामिण भागातील14, मालेगाव येथील 1 रूग्णांचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 3 हजार 497 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही घटत चालला असून मागील चोवीस तासात 2 हजार 187 नवे संशयित दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक 1 हजार 881 नाशिक शहरातील आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 3,23,934

* नाशिक : 1,92,741

* मालेगाव : 11,433

* उर्वरित जिल्हा : 1,15,356

* जिल्हा बाह्य ः 4,404

* एकूण मृत्यू: 3,497

* करोनामुक्त : 2,79,621

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com